Moshi Fire Station : कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेले मोशीतील अग्निशमन केंद्र उद्घाटनाअभावी सुरु नाही

गेले सहा ते सात महिन्यापूर्वी श्री नागेश्वर महाराज अग्निशमन केंद्र मोशी या अद्ययावत अशा इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.
Fire Station Moshi
Fire Station MoshiSakal
Updated on
Summary

गेले सहा ते सात महिन्यापूर्वी श्री नागेश्वर महाराज अग्निशमन केंद्र मोशी या अद्ययावत अशा इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.

मोशी - महानगरपालिका हद्दीतील मोशी, चऱ्होली, डुडूळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात गगनचुंबी इमारती झाल्या असून नव्याने सुध्दा होत आहेत. सदर भागामध्ये अग्निशमन केंद्र नसल्याने नविन केंद्र बांधणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे मोशी येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन महानगरपालिकेच्या वतीने श्री नागेश्वर महाराज अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते उद्घाटनाअभावी अद्यापही सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे परिसरात जर मोठ्या प्रमाणावर आग लागलीच तर या कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेल्या अग्निशमन केंद्राचा उपयोग काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गेले सहा ते सात महिन्यापूर्वी श्री नागेश्वर महाराज अग्निशमन केंद्र मोशी या अद्ययावत अशा इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मोशी, डुडळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडीतील नागरिकांना हे अग्निशमन केंद्र लाभले पण अद्यापही सुरु न झाल्याने परिसरात मध्ये आगीचा प्रकार घडल्यास या केंद्राचा काय उपयोग ठरणार आहे.

कारण मोशी येथील कचरा डेपोमध्ये नेहमीच आग लागण्याचे प्रकार घडतात. त्यावेळी कचरा डेपोतील कचऱ्याने पेट घेतल्यानंतर ही आग विझवण्याकरिता अग्निशमन दलाच्या गाड्या भोसरी, पिंपरी-चिंचवड किंवा कुदळवाडी या केंद्रातून मागवाव्या लागतात.

या गाड्या येण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागतात तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केलेले असते. आग आटोक्यात येण्याच्या वेळेपर्यंत या गाड्या वेळेत पोहचत नाहीत. पण, हेच मोशी येथील अग्निशमन केंद्र सुरु झाल्यास कचरा डेपोबरोबरच मोशी, डुडळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी आदी ठिकाणी आगीचे प्रकार घडल्यास यथून गाडया काही मिनिटाच्या आत त्या ठिकाणी पोहोचतील व तेथील आगीवरती नियंत्रण आणू शकतील. म्हणूनच, मोशी. डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी आदी परिसरात आगीचा प्रकार घडल्यास आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी या श्री नागेश्वर महाराज अग्निशमन केंद्र तत्काळ उपयुक्त ठरणार आहे.

आम्ही कचरा डेपो शेजारील तापकीर नगर येथे राहत असून कचरा डेपोमध्ये वारंवार आग लागण्याचे प्रकार घडतात. त्याची झळ आम्हाला नेहमीच पोहोचते. ही आग विझवण्यासाठी तात्काळ आगीच्या गाड्या येत नाहीत मात्र आता मोशीतील हे अग्निशमन केंद्र झाल्याने नक्कीच या ठिकाणी आग लागल्यास वेळेत गाड्या पोहोचू शकतील आणि होणारी हानी टळेल.

- चंद्रकांत तापकीर, सामाजिक कार्यकर्ते, मोशी

मोशी येथे अद्यावत असे श्री नागेश्वर महाराज अग्निशमन केंद्र उभे करण्यात आले आहे. त्याचे पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ते झाल्यास तत्काळ हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

- संजय घुबे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.

Fire Station Moshi
Pune News : लावणी जपण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारचा निर्णय, सांस्कृतिक मंत्र्यांची पिंपरीत मोठी घोषणा

* अशी आहेत मोशीतील श्री नागेश्वर महाराज अग्निशमन केंद्राची वैशिष्ट्ये ...

पाॅईंटर...

* ठिकाण : प्रभाग क्र. ३ मोशी पुणे नाशिक महामार्ग, आरोग्य केद्राशेजारी ( आरक्षण क्र. 1/178)

* एकुण खर्च : रु. 3 कोटी 89 लाख 56 हजार 443

* भुखंडाचे एकुण क्षेत्रफळ

4 हजार चौ.मी.

* एकुण बांधकाम : 704.35 चौ.मी.

* कामाची सद्यस्थिती : 100% काम पूर्ण

* उपयुक्तता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, च-होली, डुडूळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी इत्यादी भागामध्ये मोठ्या प्रमाणात हाय राईज बिल्डींग झाल्या असून नव्याने सुध्दा होत आहेत. सदर भागामध्ये अग्निशमन केंद्र नसल्याने नविन केंद्र बांधणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे सदरचे केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे.

* सदर जागेतील एकुण निवासी क्षेत्रफळ 325.31 चौ.मी. आहे.

* सदर इमारतीमधील तळमजल्याचे क्षेत्रफळ : 78.51 चौ.मी. आहे.

* पहिला मजला क्षेत्रफळ : 128.56 चौ.मी. व दुसरा मजला क्षेत्रफळ 118.16 चौ. मी. आहे.

* सदरील अग्निशमन केंद्राची इमारत एकुण 2 मजली असून तळमजल्यावर 3 अग्निशमन गाड्यांसाठी (Fire Tender vehicle) पार्किंगची व्यवस्था.

* आपत्कालीन परिस्थितीकरीता कंट्रोल रुम, स्टाफ रुम, जिमखाना, स्वच्छतागृह.

* पहिल्या मजल्यावर कर्मचचा-यांकरीता दैनंदिन कामकाजाकरीता कार्यालय (Workspace) स्वच्छतागृहासह.

* दुस-या मजल्यावर एका अधिका-याच्या कुटुंबाकरिता सदनिका बांधण्यात.

* दुस-या मजल्यावर एका अधिका-याच्या कुटुंबाकरीता सदनिका बांधण्यात आलेली आहे.

त्यामध्ये एक हॉल, दोन बेडरुम, किचन, डायनिंग, स्वच्छतागृहासह (2 BHK Flat ).

पाण्याच्या साठवणुकीकरीता 3 लाख लिटर क्षमतेचे भुमीगत पाण्याची टाकी (GSR ) व 35 हजार लिटर क्षमतेची इमारतीवर पाण्याची टाकी.

सदर बांधकामास दि. 7 नोव्हेंबर 2022 रोजी बांधकाम पुर्णत्वाचा दाखला प्राप्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.