भय इथले संपत नाही! मुळा-पवनाच्या पाण्यात वाढ

सांगवी, दापोडी नदी किनारा रहिवाशात काळजी
भय इथले संपत नाही! मुळा-पवनाच्या पाण्यात वाढ
Updated on

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगर असलेली जुनी सांगवी ही पवना व मुळा नद्यांच्या संगमावर वसलेली आहे. दोन्ही बाजुंनी नद्या असल्याने पावसाळ्यात सांगवीतील नागरिकांना पुराची धास्ती असते. येथील नागरिकांनी २००५, २०१९ साली पुराच्या पाण्याचा त्रास सहन केला आहे. २०१९ साली तर जलकोंडीचा सामना करावा लागला होता. यामुळे येथील मधुबन, मुळानगर झोपडपट्टी, प्रियदर्शनीनगर, संगमनगर, मुळानगर नदीकिनारा परिसर प्रभावाखाली येवून नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. धरण परिसर व संपुर्ण महाराष्ट्रात कमीअधिक पाऊस सुरू असल्याने दापोडी, जुनी सांगवीकरांची काळजी वाढली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सांगवी परिसरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

जुनी सांगवी हे मुळा व पवना या दोन नद्यांच्या कुशीत वसलेले आहे मुळशी तालुक्यात मुळा नदीवर मुळशी धरण आहे मुळशी तालुक्यातून ही नदी येत वाकड व बाहेरच्या शिवेवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करते. जुनी सांगवी येथे नद्यांचा संगम होतो. संगमाच्या एका बाजूला पुण्यातील बोपोडी व दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आहे. येथून पुढे मुळा नदी पुण्यात मुठा नदीला मिळते. मग त्यांची ओळख मुळा मुठा अशी होते. मुळशी धरण पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानानुसार पावसामध्ये त्यामध्ये वाढ संभवू शकते. सध्या पावसाच्या पाण्याने मुळा व पवनेची पाणी पातळी वाढली आहे.

भय इथले संपत नाही! मुळा-पवनाच्या पाण्यात वाढ
खडकवासला धरणातील विसर्ग दुपारनंतर पुन्हा वाढला

२०१९ ला येथील मधुबन सोसायटी मुळा नगर झोपडपट्टी पवनानगर घाट, जम चाळ, प्रियदर्शनी नगर, शितोळे नगर शिवांजली कॉर्नर, ममतानगर, संगम नगर, दत्तआश्रम,नवी सांगवी येथील इंद्रप्रस्थ सोसायटी हा भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला होता. रहिवासी भागात पुराचे पाणी घुसले होते. यामुळे येथील महापालिकेच्या शाळांमधून नागरिकांचे स्थलांतर करावे लागले होते. जल कोंडीचा त्यावेळेस आठ दिवस सामना करावा लागला होता. जागोजागी मुळा व पवनानदी पात्रालगत टाकलेले भराव, लोकवस्त्या, राडारोडा याच्या भरावामुळे अनेक ठिकाणी नदीचे पात्र अरुंद झाले आहे. उंच सखल भाग व प्रशासनाची याकडे झालेली डोळेझाक जल कोंडीचे एक कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सांगवीकरांची जलकोंडी होते तेव्हा पवना नदी किनारा भागातील स्मशानभूमी, वेताळ महाराज उद्यान, दशक्रिया विधी घाट, इत्यादी पाण्याखाली जातो. तर साई चौक ते माहेश्वरी चौक या भागाला पुराचा फटका बसतो.

''सध्या सुरू असलेल्या पावसाने नदीपात्रातील पाण्याची वाढ झाली आहे. मुळशी धरण क्षेत्र पन्नास टक्क्यांवर भरले आहे. या अनुषंगाने ह प्रभागांतर्गत जुनी सांगवी व परिसरातील भागाचा प्रभावी क्षेत्राची पाहणी करून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे.''

-अभिजित हराळे, प्रभाग अधिकारी, ह क्षेत्रिय कार्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.