सुनेने सततच्या भांडणातून भाच्याच्या मदतीने केला वृद्ध सासूचा खून

जमिनीच्या मिळालेल्या पैशांसाठी व घरातील सततच्या भांडणातून सुनेने सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने वृद्ध सासूचा खून केला.
Murder
MurderSakal
Updated on

पिंपरी - जमिनीच्या मिळालेल्या पैशांसाठी (Money) व घरातील सततच्या भांडणातून (Disturbance) सुनेने सराईत गुन्हेगार भाच्याच्या मदतीने वृद्ध सासूचा खून (Murder) केला. मृदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चादरीत गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. हा प्रकार देहूरोड येथे उघडकीस आला.

सोजराबाई दासा जोगदंड (वय ७०, रा. उर्दू शाळेजवळ, लक्ष्मीनगर, येरवडा) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची सून मुन्नी गेना जोगदंड (वय ५०) व इम्तियाज उर्फ चिंट्या मुस्ताक शेख (रा. ओटास्किम, निगडी) यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे. मुन्नी जोगदंड ही इम्तियाजची मावशी असून पोलिसांनी इमियाजला अटक केली आहे तर मुन्नीचा शोध सुरु आहे. सोजराबाई या १४ जुलै २०२१ ला घरातून बेपत्ता झाल्या. याबाबत त्यांची मुलगी लतिका वसंत गायकवाड यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, सोजराबाई यांचा खून केल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने इम्तियाजला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

Murder
...तरच लढत‘नॉकआउट’

सोजराबाई यांनी विकलेल्या पाच एकर जमीनीच्या पैशांवर आरोपींचा डोळा होता. तसेच सोजराबाई या घरात वारंवार भांडणतंटा करून घरातून बाहेर काढत असल्याचा राग मुन्नी हिच्या डोक्यात होता. यातून तिने तिचा भाचा इम्तियाज याच्या मदतीने सासू सोजराबाई यांना संपवायचा प्लॅन आखला.

त्यानुसार इम्तियाज १४ जुलैला रात्री चोरलेल्या रिक्षाने येरवडा येथे गेला. तेथे मुन्नी व इम्तियाज यांनी सोजराबाई यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह साडी व चादरीत बांधून देहूरोड येथे जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत झाड झुडपांच्या आडोशाला टाकला. पोलिसांना सोमवारी कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला.

इम्तियाजवर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे

इम्तियाज याच्यावर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये निगडी ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आहे. तर खडकी ठाण्यात २०१८ मध्ये दाखल गुन्ह्यात एक वर्षांपूर्वी पेरोलवर सुटला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()