पिंपरी - वारकरी संप्रदाय म्हटले की, समोर येतात संतांच्या अभंग रचना. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची अर्थात विठ्ठलभक्ती. त्यात तल्लीन होऊन नाचणारा; भजन, प्रवचन, कीर्तनात दंग होणारा वारकरी, कीर्तनकार आणि श्रीविठ्ठल भक्त..याच विठ्ठलाची भक्ती परंपरा ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कीर्तन महोत्सवात ‘सकाळ माध्यम समूह’ २२ नोव्हेंबरपासून घेऊन येणार आहे. निमित्त आहे, ‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा वर्धापन दिन आणि आळंदीतील कार्तिकी वारीचे...कीर्तनाची परंपरा महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेली आहे. वारकरी संप्रदायात तिचे बीजारोपण पंढरपुरात झाले. भक्तीची पताका आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांनी रोवली. त्यावर देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी कळस चढविला. याच आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या तीरावर संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउली यांनी संजीवन समाधी घेतली..हा समाधी दिन सोहळा अर्थात कार्तिकी वारी आणि ‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयाचा वर्धापनदिनही नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. या निमित्त ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात २२ ते २४ नोव्हेंबर रोजी कीर्तनसेवा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होईल. आणि २५ व २६ नोव्हेंबरची कीर्तनसेवा पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात होईल..पुरुषोत्तम महाराज यांची आज कीर्तनसेवापुरुषोत्तम महाराज पाटील यांची शुक्रवारी (ता. २२) चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी ४.३० वाजता कीर्तनसेवा होणार आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या उपक्रमाबद्दल वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून मनस्वी आनंद होतो. हा उपक्रम नाट्यगृहात आयोजित केला जातो. जिथे वक्ते व श्रोते यांच्यात व्यवस्थित संवाद साधता येतो. आत्ताच्या काळात असा उपक्रम होणे ही अतिशय कौतुकाची बाब आहे..समाजात व्यभिचार, अत्याचार, भ्रष्टाचार हे घडत आहेत. त्यावर बंधन यावे, यासाठी माणसाला चांगल्या संस्कारांची गरज आहे. आजच्या युगात माणूस खूप तणावात असतो; खूप विचारात असतो. त्याला आत्मिक समाधानापर्यंत घेऊन जाण्यासाठी व खऱ्या अर्थी समाजाला योग्य दिशा मिळण्यासाठी हा उपक्रम नेहमी चालू ठेवावा. यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ला शुभेच्छा!- पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकारअधिक माहितीसाठी संपर्क :प्रशांत - ८३८००७४८२३.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.