वाकड : रात्र प्रशालेत मिळत आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ

बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सनफ्लॉवर स्कुलचा अभिनव उपक्रम
Night school
Night school sakal
Updated on

वाकड : जुन्या काळातील शिक्षणाच्या गुरुकुल पद्धती कालातंराने बंद झाल्या मात्र गुरुकुल शिक्षणातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण करत विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी मारुंजी येथे चक्क रात्र शाळा भरवली जात आहे. परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालवून आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याबरोबर त्यांच्या स्वप्नांनांही येथे बळ मिळत असल्याने या अभिनव उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

मारुंजी येथील लोकमित्र परिवाराच्या

सनफ्लॉवर पब्लिक स्कूलमध्ये १० वी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरपासून दिवसा बरोबर रात्री देखील शाळा भरत आहे. या आगळ्या वेगळ्या रात्र शाळेचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजी बुचडे स्वतः उपस्थित राहुन करतात तर प्राध्यापक डी. एम. चव्हाण व शिक्षकवृंद रात्री वर्ग भरवून विद्यार्थ्यांच्या सरावार मेहनत घेत आहेत. परीक्षेची पूर्व तयारी, वेळेचे व्यवस्थापन, पेपर वाचन, पेपर सोडविण्याचे कौशल्य आदी बाबींचा उहापोह या ठिकाणी होत आहे.

प्रत्येक विषयाची तसेच अवघड वाटणाऱ्या विषयांची स्वतंत्र तयारी करून घेण्याबरोबर येथे आठवड्यातून दोन वेळा विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची कवायत होते. योगा शिबिर, ध्येयाच्या दृष्टीने कारावयाची वाटचाल अन त्यासाठी घ्यावयाची मेहनत याबाबत मार्गदर्शन केेेले जाते. येथील सैनिकी अकादमीचे माजी सैनिक रामदास मदने व त्यांच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची टीम विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असून ते निःस्वार्थीपणे अहोरात्र कष्ट घेतात शाळेत उपस्थित राहून विद्यार्थांच्या प्रगतीकडे लक्ष्य केंद्रित केले आहे.

या सर्व प्रकारामुळे पालकांची मात्र चिंता मिटली असून ते अत्यंत समाधानी आहेत. प्रशालेच्या प्रशस्थ मैदानावर तर कधी डिजिटल क्लासरूमच्या वातावरणात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांचा अभ्यास करून घेतात. त्यामुळे अतिशय मनापासून वा आवडीने विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ न थकता अभ्यास करतात वेळेत झोपणे व ठरवून दिलेल्या वेळेत सकाळी उठणे सकाळी उठल्यावर प्राध्यापक डी एम चव्हाण यांच्या हस्यायोग प्रयोगाने पहाटेचा अभ्यास सुरू होतो.

रात्र अभ्यासिकेमुळे वेळेचे छान नियोजन करता आले. सुरुवातीला अशक्य वाटणारी रात्र अभ्यासिका नंतर आवडीचा विषय झाला डिसेंबरपासून मार्चपर्यंत आभ्यासात वेळ कसा गेला कळलेच नाही. सकाळी प्रसन्न वातावरणात हास्ययोग प्रयोगाचा खुप आनंद घेत आहोत. प्रा.डी.एम चव्हाण यांच्या हास्ययोग प्रयोगाची उर्जा दिवस पुरते

- शुभम कपनोरे (विद्यार्थी, ई १०वी)

विद्यार्थ्यांना पैलू पाडने हा एकमेव हेतू समोर ठेवून रा ही संकल्पना उदयास आली. मधमाशीप्रमाणे अखंड कष्ट करण्याची सवय लावणे हा एकमेव हेतू होता. आणि तो साध्य झाल्याचे समाधान आहे. विध्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली कि ते स्वतः अभ्यास करतात हा अनुभव आला पालकांचा प्रतिसाद खुप छान आहे.

- प्रा. डी.एम.चव्हाण

रात्री ९.३० वा. मुलाचा जेवणाचा उबा घेऊन गेलो होतो तेव्हा सर्वच मुले अभ्यासात तल्लीन असल्याचे दिसले. टाचणी पडल्यावर आवाज येईल ऐवढी शांतता व शाळेच्या शिस्तीचे कौतुक वाटले. पालकांना स्वतःचं एक मूल सांभाळताना त्रास होतो. मात्र हे वातावरण पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला .

- प्रमोद जगताप (पालक)

असा आहे दिनक्रम

  • सकाळी ७ ते ९ - घरी आवरणे व डबा

  • सकाळी ९ ते २.३० शाळा

  • दुपारी २.३० ते ५.३० घरी आराम

  • सायंकाळी ५.३० ते ९.३० शाळेत अभ्यास

  • रात्री ९.३० ला जेवणाची सुट्टी

  • रात्री १० ते पहाटे ४.३० वाजे पर्यंत झोप

  • पहाटे ४.३० ते ५ हास्ययोग प्रयोग

  • पहाटे ५ ते ७ पहाटेचा अभ्यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.