तरूणांनी काळाची पावले ओळखून वागले पाहिजे - निवृत्तीमहाराज देशमुख

भोसरी येथे कीर्तन महोत्सवातील पहिले पुष्प; कष्ट करून जीवन जगण्याचे केले तरुणांना आवाहन
Nivritimaharaj Deshmukh appeal to youth to live life by working hard pimpri
Nivritimaharaj Deshmukh appeal to youth to live life by working hard pimprisakal
Updated on

पिंपरी : तरूणांनी काळाची पावले ओळखून वागले पाहिजे . कष्ट करून जीवन जगावे. तसेच प्रपंचात न अडकता परमार्थ साधला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख यांनी भोसरी येथे नुकतेच केले. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे आई- वडील कै. विठोबा लांडे व कै. इंदुबाई लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या प्रांगणात गुरुवार दिनांक १४ ते २१ जुलै २०२२ दरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त गुरूवारी (ता. १४) निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पहिल्या पुष्पात प्रबोधन करत होते.

निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले की, आजच्या या काळात विलास लांडे मुलगा आपल्या आई-वडिलांची वारकरी परंपरा पुढे मोठ्या भक्ती भावाने चालवत आहे. लांडे घराण्यातली तिसरी पिढी संप्रदायाचा वसा विक्रांत लांडे व विराज लांडे यांच्या रूपाने पुढे चालवताना दिसत आहे. राजकारणाबरोबर समाजकारण आणि समाजकारणाबरोबर वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्याला या लांडे कुटुंबीयांकडून शिकायला मिळते. त्यांनी आपल्या आई-वडीलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. चांगल्याची संगत ठेवली तर; माणसाची प्रगती होते. तुकोबारायांची गाथा पांडुरंगाचा प्रसाद आहे. कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. मरणोत्तर ज्ञान व कर्म माणसाबरोबर जाते, असे देशमुख महाराज यांनी सांगितले.

कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी पुरुषोत्तम महाराजांनी विशेष योगदान दिले. विलास लांडे, माजी महापौर मोहिनी लांडे, विश्वनाथ लांडे, संगीता लांडे यांच्यासह संस्थेचे सचिव सुधीर मुंगसे, खजिनदार अजित गव्हाणे, विश्वस्त विश्वनाथ कोरडे, विश्वस्त विक्रांत लांडे, संजोग वाघेरे, पंकज भालेकर आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.