भर चौकात खून होत नाही तोपर्यंत...कृष्ण प्रकाश यांचे अजब वक्तव्य

भर चौकात खून होत नाही तोपर्यंत...कृष्ण प्रकाश यांचे अजब वक्तव्य
Updated on

पिंपरी, : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आठवड्याभरात घडलेल्या खुनाच्या घटनांबाबत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अजब विधान केलंय. जोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी, सर्वांसमोर, भररस्त्यात, चौकात अशा घटना घडत नाहीत, तोपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे म्हणता येत नाही, असे वक्त्यव्य त्यांनी केले आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील चार दिवसात खुनाच्या सहा घटना घडल्या असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कृष्ण प्रकाश म्हणाले, ''मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी खुनाच्या घटल्या आहेत. जोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी, सर्वांसमोर, भररस्त्यात चौकात अशा घटना घडत नाहीत, तोपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा प्रश्नच उध्दभवू शकत नाही. रागाच्या भरात, अनैतिक संबंधातून, आर्थिक कारणातून होणारे गुन्हे वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे असतात. त्याची गणना सामाजिक गुन्ह्यात होत नाही. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण होण्याचे कारण नाही. एकाच माणसाने दहा लोकांना मारले असेल तर भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. पण वैयक्तिक गुन्ह्यातून भीतीचे वातावरण निर्माण होत नाही. शहरात अनेक कामगार वस्त्या असून येथे लॉकडाऊनच्या काळात बाहेरून अनेक लोक आले आहेत. त्यांच्यात एकमेकांमध्ये विविध कारणांवरून वाद होत असतात. त्याप्रमाणेच मागील काही दिवसात घडलेल्या घटना आर्थिक कारणासह, अनैतिक संबंधातून तसेच दारूच्या नशेतून घडल्या आहेत. त्यामुळे समाजात कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण होण्याचे कारण नाही'' आयुक्तालय हद्दीत कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित असल्याचेही कृष्ण प्रकाश म्हणाले.

भर चौकात खून होत नाही तोपर्यंत...कृष्ण प्रकाश यांचे अजब वक्तव्य
पुण्यात नितीन गडकरींच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बॅनर

दरम्यान, निगडी, तळेगाव दाभाडे, बाणेर, चिखली येथील खुनाच्या घटना ताज्या असतानाच गुरुवारी रावेत व डांगे चौक येथे पुन्हा दोन घटना घडल्या. चार दिवसांत सहा खुनाच्या घटना घडल्याने पिंपरी-चिंचवड हादरले आहे. रावेत येथील घटनेत खैरूनबी ऊर्फ मुन्नी हैदर नदाफ (वय ३८, रा. जाधव वस्ती, रावेत) या महिलेचा तिच्या पतीने खून केला. याप्रकरणी हैदर साहेबलाल नदाफ (रा. लोणी स्टेशन, मूळ-सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मृत व महिला हे दोघे पती-पत्नी असून, दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करीत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून मृत महिला तीन मुलांना घेऊन रावेतमधील जाधव वस्ती येथे राहण्यास आली होती. याचा राग आल्याने आरोपी हैदर याने रागाच्या भरात पत्नीचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केला. ही घटना बुधवारी (ता. २२) रात्री साडे आठच्या सुमारास घडली. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

भर चौकात खून होत नाही तोपर्यंत...कृष्ण प्रकाश यांचे अजब वक्तव्य
ओशोंच्या आश्रमात घोटाळा? अनुयायांनी घेतली रामदास आठवलेंची भेट

डांगे चौक येथील घटनेत रोहन दिलीप कांबळे (वय ३०, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, चांदणी चौक, धायरीगाव) या तरुणाचा खून झाला. दिलीप शंकर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे घरी असताना रोहन यांचा मित्र संदीप जाधव यांनी रोहनच्या वडिलांना फोन करून सांगितले की, ''रोहन डांगे चौकातील रॉयल कंट्री वाईन्स दुकानासमोर पडला असून, त्याच्या नका तोंडातून रक्त आहे.''

त्यानंतर रोहनच्या वडिलांनी त्याठिकाणी जाऊन चौकशी केली असता रोहनला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले. रोहन बुधवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास रॉयल कंट्री वाईन्स या दुकानातून दारू पिऊन बाहेर गेल्याचे त्यांना समजले. दरम्यान, दिलीप कांबळे यांनी रुग्णालयात धाव घेतली असता गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टरांनी रोहनला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात रोहन यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारल्याने कवटी फुटून त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस आरोपीच्या मागावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.