अजित पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसची शहरात शक्तिप्रदर्शनाची तयारी

४६ प्रभागात ४६ विविध कार्यक्रम
occasion of Ajit Pawar birthday NCP Procession 46 different programs in 46 ward pimpri
occasion of Ajit Pawar birthday NCP Procession 46 different programs in 46 ward pimprisakal
Updated on

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा यांच्यावतीने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचेच स्थानिक नेते फोडून भारतीय जनता पक्षाने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत बाजी मारली होती. अजित पवार यांची महापालिका अशी ओळख असलेल्या या महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवायची हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेचे झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने दिनांक २२ ते ३० जुलै २०२२ दरम्यान शहरातील ४६ प्रभागांमध्ये इच्छूक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध ४६ कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामध्ये रक्तदान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छित्र्यांचे वाटप अशा कार्यक्रमांचा सहभाग आहे. त्याच बरोबर पक्षाच्यावतीने या ४६ प्रभागांमध्ये सभासद नोंदणी, प्रभाग व फलकांचे उद्घाटन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला विभागाच्यावतीनेही महिलांना लघुउद्योजक बनण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

‘स्नेह आनंदाचा सन्मान निष्ठेचा’

राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर-जिल्ह्याच्यावतीने दिनांक २७ ते २९ दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना वेळ मागण्यात आली आहे. त्यांच्या हस्ते ‘स्नेह आनंदाचा सन्मान निष्ठेचा’ या उपक्रमा अंतर्गत शहरातील १९७० पासून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर जे कार्यकर्ते, पदाधिकारी निष्ठावंत म्हणून राहिले त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे व प्रवक्ते, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांनी दै. ‘सकाळ’ला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.