पिंपरी-चिंचवडमध्ये कोविड रुग्णालयात ऑक्सिजन गळती!

टँकरमधून आणलेला ऑक्सिजन एका टाकीमधून दुसऱ्या टाकीमध्ये भरताना दुर्घटना घडली.
YCM Pimpri
YCM PimpriFile photo
Updated on
Summary

टँकरमधून आणलेला ऑक्सिजन एका टाकीमधून दुसऱ्या टाकीमध्ये भरताना प्रेशर जास्त झाल्याने सेफ्टी वॉल लिकेज झाला आणि मोठ्या प्रमाणत गॅस गळती झाल्याची घटना आहे.

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी रात्री ऑक्सिजन गळती झाल्याची घटना घडली. या कोविड समर्पित रुग्णालयाला (dedicated covid hospital) ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या १० टन टँकच्या सेफ्टी वॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती झाली. सुदैवाने रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. (Oxygen leakage at YCM Hospital in Pimpri-Chinchwad)

प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकमध्ये ऑक्सिजन भरण्याचे काम सुरू होते. त्याचदरम्यान दाब जास्त झाल्याने टाकीचा सेफ्टी व्होल्व्ह लिक झाला. सुदैवाने अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

YCM Pimpri
महापालिका आयुक्तांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते

या रुग्णालयात ८०० बेड्स आहेत. सध्यस्थितीत ४०६ कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन लिक झाल्यानंतर रुग्णांवर त्याचा काय परिणाम झाला का? या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणी महापालिका आयुक्त राजेश पाटील, वैद्यकीय विभाग प्रमुख यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप संपर्क झाला नाही.

नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली

काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात सुद्धा अशाच प्रकारे ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत रुग्णालयातील २२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत त्यानंतर शासनाने जाहीर केली होती.

(Edited by : Ashish N. Kadam)

पिंपरी-चिंचवडमधील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()