ऑक्सिजन निर्मितीचे मावळात दोन प्रकल्प उभारणार; आमदार सुनील शेळके

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तालुक्यात आतापर्यंत एक हजार ८०७ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
Sunil Shelake
Sunil ShelakeSakal
Updated on

वडगाव मावळ - कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेचा (Third Wave) सामना करण्यासाठी मावळात (Maval) आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन (Management) करण्यात आले असून, त्यात दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा (Oxygen Prodcution Project) समावेश असल्याची माहिती आमदार सुनील शेळके (Sunil Shelake) यांनी दिली. तालुक्यातील नियोजनाची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे उपस्थित होते. (Oxygen Production Two Project in Maval Sunil Shelake)

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तालुक्यात आतापर्यंत एक हजार ८०७ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा कोविड केअर सेंटर, दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, एक नवीन गॅसदाहिनी उभारणीचे काम सुरू आहे. ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिव्हिर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कान्हे व पवनानगर या दोन ठिकाणी नवीन ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीचे व वडगाव येथील स्मशानभूमीत नवीन गॅसदाहिनी बसविण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील ८४ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती त्यांनी दिली.

Sunil Shelake
डेक्कन क्वीन बंद केल्याने शेकडो प्रवाशांची गैरसोय

मोफत रुग्णवाहिका सुविधा

रुग्णांसाठी सरकारच्या सहा, देहू नगर पंचायत एक, राष्ट्रवादीच्या दोन, आमदार निधीतून एक, कार्ला देवस्थान एक, जनसेवा विकास समिती एक, देहूरोड येथील डॉ. आंबेडकर रुग्णालयात दोन अशा १४ रुग्णवाहिका व सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टची एक शववाहिका मोफत सेवा देत असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

दिवसाला १० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट्य

तालुक्यात एकूण २६ केंद्रांवर लसीकरण सुरू असून, लस उपलब्ध झाली तर दररोज दहा हजार लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविण्याचे नियोजन केले आहे.

शिवभोजन थाळी

गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दररोज ८२५ नागरिकांना लाभ मिळत आहे. अजून शंभर मोफत थाळ्यांची उपलब्धता आहे. नागरिकांना सुलभ उपचार मिळावेत यादृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. परंतु, नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करावे. डॉक्टरांनी रुग्णांवर सहानुभूतीपूर्वक उपचार करावेत, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

Sunil Shelake
महिलांनी साकारल्या रामायणातील स्त्री व्यक्तिरेखा

अठराशे बेडचे नियोजन

सुगी पश्चात केंद्र, तोलानी इन्स्टिट्यूट, समुद्रा इन्स्टिट्यूट, लोणावळा नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या सहा ठिकाणी दीड महिन्यांपासून सेंटर सुरू आहेत. तेथे ७४६ बेड आहे. सध्या या केंद्रांमध्ये ४२३ रुग्ण उपचार घेत असून, ३२३ बेड उपलब्ध आहेत. गरज लागल्यास अजून एक हजार ८०० बेडचे नियोजन केले आहे. मायमर, अथर्व, पायोनियर, संत तुकाराम हॉस्पिटल देहू व संजीवनी हॉस्पिटल लोणावळा या पाच रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू आहे. खासगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दरांपेक्षा उपचारांसाठी जादा दर आकारले जात असतील तर तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले.

महिलांसाठी ५०० रुपयांत एचआरसीटी टेस्ट

कोरोना निदानासाठी कराव्या लागणाऱ्या एचआरसीटी टेस्टसाठी सरकारने दोन हजार रुपये दर निश्चित केला आहे. परंतु तालुक्यातील महिला रुग्णांचे वाढते प्रमाण व महिलांना दिलासा देण्याच्या उद्देशाने कुलस्वामिनी महिला मंच व मावळ तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माध्यमातून सहा ठिकाणी सवलतीच्या दरात फक्त पाचशे रुपयांत ही टेस्ट केली जाणार असल्याची घोषणा आमदार शेळके यांनी केली. पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, साक्षी डायग्नोस्टीक सेंटर, मायमर हॉस्पिटल, लोणावळा सिटी स्कॅन सेंटर या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.