दहावी परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नसल्याने पालक-विद्यार्थी गोंधळात

दहावी परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता अजिबात नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत.
SSC Exam
SSC ExamSakal
Updated on

पिंपरी - कोरोनाच्या (Corona) परिस्थितीमुळे महाराष्ट्र सरकारने अनेक तज्ज्ञांच्या सल्ल्याने दहावी परीक्षा (SSC Exam) रद्द करण्याचा निकाल निर्णय घेतला. परंतु परीक्षा रद्द का केल्या? असा सवाल उच्च न्यायालयाने (High Court) राज्य सरकारला (State Government) जाब विचारला आहे. मार्च-एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा देण्याची होती. विद्यार्थ्यांनी (Student) अभ्यास पूर्ण केलेला होता. मात्र, आता न्यायालयामुळे सरकारने आता जर परीक्षा घ्यायचे ठरवले तर कधी घेणार? सध्या परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता (Mentality) अजिबात नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. (Parents Students are Confused No Mentality of Students to give SSC Exam)

संगीता निंबाळकर (समुपदेशक, श्री म्हाळसाकांत विद्यालय) - ‘आता परीक्षेचे नियोजन केव्हा आणि कसे करणार? विद्यार्थ्याचे मूल्यमापन फक्त परीक्षेवर अवलंबून नसते. त्याच्यामध्ये क्षमता, व्यक्तिमत्त्व आवड, बुद्धिमत्ता, समाज समायोजन क्षमता अशा साधनांचा उपयोग मूल्यमापनात होत असतो. त्यामुळे दहावीची ऑफलाइन परीक्षा घेणे, हे वास्तवाला धरून नाही. ऑनलाइन परीक्षेला सामोरे जाण्याइतकी सक्षमता आपल्याकडे नाही. त्यामुळे ऑनलाइन, ऑफलाइनचा आग्रह न धरता विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाबाबत धोरण ठरवावे. अकरावी प्रवेश परीक्षा घेतली तरी चालेल. परंतु दहावीची परीक्षा देण्याच्या मनःस्थितीत आज विद्यार्थी नाहीत. पालकांचाही परीक्षा घेण्याला विरोध आहे.’’

SSC Exam
दोन सख्ख्या भावांचा कोरोनाविरुद्धचा लढा अपयशी

महेंद्र गणपुले (प्रवक्ता, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ) - ‘सीबीएससी’ने जाहीर केलेला मूल्यमापन आराखडा आपल्या बोर्डाशी तुलना केल्यास मर्यादा आणि विविधता आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार केल्यास आपल्याकडे विश्वासार्ह मूल्यमापन म्हणजे फक्त गतवर्षीचे नववीचे निकाल पत्रक आहे. यावर्षीच्या सराव परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच गतवर्षीच्या नववी निकालाचा आधार घेऊन योग्य मार्ग काढावा लागेल. आता परीक्षेची मानसिकता राहिलेली नाही. तिचे आयोजन देखील सहजासहजी शक्य नाही.

मंगल शिंदे (शिक्षिका) - कोरोनाच्या परिस्थितीत परीक्षा घेऊ नये. मुलांची आणि पालकांची मानसिक स्थिती पाहता परीक्षा न घेणे योग्य राहील. मात्र, अंतर्गत मूल्यमापनासाठी योग्य त्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात. कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन कार्यवाही व्हावी.

कविता अंबवले (शिक्षिका) - ‘परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. हा अतिशय योग्य निर्णय आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी मात्र एखादी प्रवेश परीक्षा घेतली जावी, असे एक शिक्षक म्हणून आवश्यक वाटते.

भगवान पांडेकर ( शिक्षक) - राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्याची सर्वप्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारने एखादी अकरावी प्रवेश यासाठी एक छोटीशी प्रवेश परीक्षा घ्यावी. प्रवेश परीक्षेची योग्य प्रकारे नियोजन व आयोजन लवकरात लवकर जाहीर करावे.’

विद्यार्थी म्हणतात...

परीक्षा रद्द करणे हा योग्य निर्णय आहे. आता परीक्षा घेणे बरोबर होणार नाही. परंतु आमच्या अकरावी प्रवेशाबद्दल विचार करून सरकारने त्यासाठी निर्णय घ्यावा.’

- सत्यजित जाधव

सद्यःस्थितीत परीक्षा रद्द करणे योग्य आहे. परंतु, अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसाठी काही उपाययोजना ठरविल्या पाहिजेत.

- आयुष नाटेकर

परीक्षा रद्द करणे हा एक योग्य निर्णय आहे. कारण परिस्थिती अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. म्हणून आता प्राधान्याने सरकारने आमचा दहावीचा निकाल आणि पुढील प्रवेश व प्रक्रिया यांचा निर्णय घ्यावा.

- गौरी मांडलिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.