- जयंत जाधव
पिंपरी - एकेकाळी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच स्थानिक नेते फोडून भारतीय जनता पक्षाने २०१७ मध्ये सत्ता हस्तगत केली. कॉंग्रेसचे दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर सुमारे १५ वर्षे एकहाती कारभार पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी सवता सुभा करत भाजपशी जवळीक साधली.