पिंपरी - विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत साधारणपणे दुरंगी लढतीच झाल्याचे बुधवारी झालेल्या मतदानादरम्यान आढळून आले. त्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशाच लढती रंगल्या..त्यांचे तीनही मतदारसंघातील उमेदवार माजी नगरसेवक आहेत. त्यांतील दोघांना आमदारकीचा अनुभव असून, तीनजण नवखे होते. दोघांना निवडणूक लढविण्याचा अनुभव होता. निकाल काहीही लागला तरी, तीनही मतदारसंघातून माजी नगरसेवकच आमदार होणार, अशी स्थिती आहे..चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नगरसेवकपदाचा अनुभव आहे. त्यांच्याशिवाय, अन्य तीन उमेदवारही माजी नगरसेवक होते. विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघात २१, पिंपरीमध्ये १५ आणि भोसरीत ११ असे ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.बुधवारी (ता. २०) झालेल्या मतदानानंतर त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी (ता. २३) मतमोजणी होऊन निकाल लागेल आणि मतदारांनी आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात टाकली हेही स्पष्ट होईल. मात्र, आमदार होईल, तो माजी नगरसेवक असेल, हे नक्की..प्रमुख लढतीत माजी नगरसेवकचिंचवड विधानसभाचिंचवड मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे यांच्यात लढत आहे. जगताप हे २००७ ते २०१२ काळात महापालिकेत नगरसेवक होते. २०१७-२०२२ या कालावधीत कलाटे नगरसेवक होते. त्या व्यतिरिक्त अपक्ष निवडणूक लढलेले भाऊसाहेब भोईर १९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या कालावधीत पाच वेळा नगरसेवक होते. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार मारुती भापकर २००७ ते २०१२ या काळात नगरसेवक होते..पिंपरी विधानसभापिंपरी मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. सुलक्षणा धर-शिलवंत यांच्यातच प्रमुख लढत झाल्याचे पहायला मिळाले. बनसोडे हे १९९७ ते २०१२ या कालावधीत नगरसेवक होते. तर, २०१७ ते २०२२ या कालावधीत शिलवंत नगरसेविका होत्या. २००९ ते २०१४ आणि २०१९ ते २०२४ या कालावधीत बनसोडे आमदारही होते. या शिवाय, पिंपरी मतदारसंघातून माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनीही निवडणूक लढवली. ते २०१७ ते २०२२ या कालावधीत नगरसेवक होते..भोसरी विधानसभाभोसरी मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात मुख्य लढत झाली. २००४ ते २०१७ या कालावधीत ते नगरसेवक होते. भोसरी विधानसभा मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत महेश लांडगे जिंकून आले होते. २०१९ मध्येही त्यांनी विजय मिळवला होता. अजित गव्हाणे यांनाही नगरसेवकपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. २००२ पासून २०२२ या २० वर्षांच्या कालावधीत ते नगरसेवक होते.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.