- जयंत जाधव
पिंपरी - पिंपरी-चिंचवड उद्योनगरीशी गेली पाच दशके संपर्क असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भोसरी, चिंचवड व पिंपरी मतदारसंघात बुधवारी (ता. १३) आणि गुरुवारी (ता. १४) होणाऱ्या प्रचारादरम्यान कुठला ‘राखीव डाव’ टाकतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.