‘ना भय, ना भ्रष्टाचार’ गोंडस घोषणेचा कचरा!

२०१७च्या निवडणुकीत भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविली. मात्र राज्याची बातमी ठरली होती -पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे पानिपत!
pimpri chinchwad
pimpri chinchwadsakal
Updated on

मित्रत्वाच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी लग्नापूर्वीच्या मनोरंजनपर कार्यक्रमासाठी आले. तिथे आनंदापोटी काही मिनिटे थिरकले. मात्र, भाजप शहराध्यक्षांनी दगाफटका केला. ‘फ्रेंडशिप डे’चा मुहूर्त साधून व्हिडिओ व्हायरल करत भरपूर मजा लुटलीच, शिवाय सळो की पळो करून सोडले...या घटनेनंतर आता बरोबर १९ दिवसांनी-भाजपचा चेहरा काळाठिक्कर पडला आहे. कारण स्थायी समितीच्या अध्यक्षालाच लाच प्रकरणात अटक झाली. ‘ना भय, ना भ्रष्टाचार’ या गोंडस घोषणेचा पार कचरा झाला आहे. तरीही आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप म्हणतात- लाच प्रकरण संशयास्पद आहे. अरेरे! असं कसं चालेल?

२०१७च्या निवडणुकीत भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविली. मात्र राज्याची बातमी ठरली होती -पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे पानिपत! आता यानंतरच्या घडामोडी वगैरे हा इतिहास झाला. परंतु, भाजपचा वारू चौखूर उधळला. गेल्या साडेचार वर्षात दोन नेत्यांनी पदाधिकारी तर नावालाच नेमले. सगळा कारभार आपल्याच हातात ठेवला. खाली मान घालून कारभार करेल, अशांनाच पदे दिली. अशा पद वाटपामुळे पक्षांतर्गत नाराजी झालीच, शिवाय नेत्यांमध्येही संवाद उरला नाही. ‘याला पाड, त्याला गाड’ अजूनही सुरूच आहे. राज्यपातळीवरील नेत्यांना हे सारे माहीत आहे. मात्र, तेही काही करू शकत नाही. कारण लांडगे-जगताप सोडले तर भाजप शून्य आहे. या साऱ्यात कार्यकर्ते भरडून निघाले आहेत. भाजपचे जुने कार्यकर्ते हताश होण्यापलिकडे काही करू शकत नाहीत.

pimpri chinchwad
पिंपरी : पैसे काढण्यासाठी सेवा विकास बँकेत गर्दी

मिळालेले प्रचंड बहुमत, प्रदेश पातळीवरील नेत्यांची अगतिकता आणि मान टाकलेले विरोधी पक्ष यामुळे भयच उरले नाही. पहिल्यांदा दोन मोठ्या वाटण्या. नंतरचे वाटे पदाधिकारी, भावकीतला नगरसेवक, खबरी नगरसेवक...अशा उतरत्या क्रमाची पाकिटे घरपोच जाऊ लागली. अनेकांना उपठेकेदारही बनवले. ‘येथे ठेकेदारीचा आणि टक्केवारीचा मलिदा वाटप सुरू आहे’ अशी पाटीच दिसत असल्याने ‘राष्ट्रवादी’च्याही तोंडाला पाणी सुटले. ते भाजप नेत्यांच्या कळपात घुसले. मित्र बनले. साहजिकच सभागृहात विरोधी पक्ष संपला. यातूनच गेल्या साडेचार वर्षात भाजप विरोधातील कारभाराची एकही फाइल राष्ट्रवादीकडून ओपन झाली नाही. खरे तर भाजपमधील काही बंडखोरांना मानावे लागेल. कारण त्यांनी आपल्या पक्षातील भ्रष्टाचारावर बोट ठेवले, नेत्यांविरोधात आवाज उठविला. राष्ट्रवादीला ते जमले नाही. सर्वजण केवळ पत्रकबहाद्दर निघाले. पोकळ आंदोलने करत राहिले. यातूनच भाजप नेते बेलगाम राहिले.

pimpri chinchwad
पिंपरी चिंचवड: आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत निवड

भ्रष्टाचार चव्हाट्यावर येवूच नये अशीच व्यूहरचना करत भाजप नेत्यांनी आजवरचा कारभार हाकला आहे. मात्र, स्वतःच्याच व्यूहरचनेत भाजपचा ‘अभिमन्यू’ झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समिती अध्यक्षाला पकडले. नेत्यांना याचा इतका मोठा धक्का बसला की काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नव्हते. सत्तारूढ पक्षनेता इतके गोंधळून केले की त्यांना बोलता येईना. जगताप व लांडगे यांनी दुसऱ्यादिवशी घाईगडबडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तर कहर केला. घेतलेली लाच आणि झालेली अटक या प्रकरणावरच संशय व्यक्त करत चौकशीअंती सत्य समोर येईल असे ते म्हणाले. यानंतर लांडगे तर शहर सोडून बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने सांगलीला गेले. नेतेहो, असं कसं चालेल?

pimpri chinchwad
पिंपरी : रविवारी मिळणार 'कोव्हॅक्सिन'चा दुसरा डोस

या घटनेने भाजममधील एका मोठ्या गटाला मोठा आनंद झाला आहे. यात जगताप-लांडगे जोडगोळीवर नाराज असलेले आहेतच, शिवाय पदवाटपात अन्याय झालेले, निवणुकीत उमेदवारी डावललेले, नगरसेवक होवूनही अवमानकारक वागणूक मिळालेले यांचा समावेश आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मोठ्या वेगाने बॅकफुटवर गेली आहे. आता या घबाड संधीचा फायदा मुखदुर्बळ राष्ट्रवादी, फाटाफुटीची शिवसेना आगामी निवडणुकीत कसा घेतात. यावर निवडणुकीतील चित्र अवलंबून आहे. सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सर्व पक्षांनी आंदोलने करताना दाखविलेली एकजुट किती मजबुत आहे, हे निवडणुक जाहीर होईपर्यंत सांगता येणार नाही. एकमात्र नक्की, राष्ट्रवादी व शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होण्याची चाहूल लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.