भोसरीत टोळक्याचा तरुणावर भररस्त्यात कोयत्याने प्राणघातक हल्ला

पिंपरी-चिंचवडमधील आठ दिवसातील तिसरी घटना
pune
punesakal
Updated on

पिंपरी : पिंपरी व चिखलीत टोळक्याने दुकानदारावर हल्ला केल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच कोयत्याने हल्ला केल्याची भोसरीत आणखी एक घटना घडली. टोळक्याने भररस्त्यात तरुणावर कोयत्याने वार करीत सिमेंटच्या गट्टू मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

प्रज्वल गोपाळे मकेश्वर (वय 19 राहणार वडगाव रोड आळंदी) असे या कोयत्याने हल्ला झालेल्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर बडगे, देवा सुतार, शिवा भेंडेकर, मयुर मानकर, अजय देवरस, आकाश नाईक, दिलीप हंगे, तेजस गलफडे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी भोसरी दिघी रोड येथे आले होते. तिथे आपल्या समोर नाचत असल्याच्या कारणावरून बडगे याच्यासह आरोपींनी प्रज्वल व त्यांच्या मित्रांना दमदाटी केली. 'मी आळंदीचा भाई आहे, यांना दाखवा रे आपला दम' असे म्हणत प्रज्वल यांच्यावर कोयत्याने वार करत सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. तसेच आरडाओरडा करीत परिसरात दहशत माजवली.

दरम्यान, शुक्रवारी चिखलीतील ताम्हाणे वस्ती येथिल कपड्याच्या दुकानात शिरलेल्या टोळक्याने महिलेवर कोयत्याने हल्ला करून शर्ट व तीन जिन्स पॅन्ट चोरल्या.

तसेच मागील आठवड्यातही पिंपरीतील एका दुकानातून टोळक्याने बूट घेतल्यानंतर पैसे न देता निघाले. दुकानदाराने पैसे मागितले असता त्यांच्यावर हत्याराने वार करुन दुकानाची तोडफोड केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.