money.
money.Sakal

Pimpri-Chinchwad: कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस प्रतीक्षा

Pimpri-Chinchwad: दिवाळीनिमित्त निश्चित केलेला बोनस मिळत नसल्याची तक्रार महापालिका कामगार कर्मचारी सेनेने केली आहे.
Published on

पिंपरी, ता.२७ ः शहरात विविध कार्यालयांत ठेकेदार पद्धतीने कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. त्यांना कामगार कायद्याप्रमाणे वेतनही निश्चित केले आहे. मात्र, त्यांना दिवाळीनिमित्त निश्चित केलेला बोनस मिळत नसल्याची तक्रार महापालिका कामगार कर्मचारी सेनेने केली आहे. याबाबत संघटनेने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात शहराध्यक्ष रूपेश पटेकर यांनी म्हटले आहे की, ‘‘कर्मचारी अल्पशिक्षित किंवा निरक्षर असल्यामुळे त्यांना बोनसच्या रकमेबाबत निश्चित माहिती नाही. त्यामुळे, काही विभाग व क्षेत्रीय कार्यालय मार्फत ठेकेदार बक्षीस स्वरूप बोनस वाटप करत असतो.

कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये; तर काही कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये, अशा पद्धतीने बोनस दिला जातो. गोरगरीब कर्मचारी आपल्याला कामावरून काढू नयेत, या भीतीने वर्षभर काम करतो. त्यांना दिवाळी बोनसची अपेक्षा असते. पण, ठेकेदार मनमानी करत आहेत.

कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे बोनस दिला जात नाही. ठेकेदारावर करारनाम्याच्या नियमाप्रमाणे लक्ष दिले तर नक्कीच गोरगरीब सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक अशा सारख्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळेल व त्यांचे कुटुंब आनंदाने दिवाळी साजरी करतील. अन्यथा संबंधित विभागातील अधिकाऱ्याच्या कार्यालयात फटाके वाजवले जातील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.