Pimpri-Chinchwad :रोडरोमियोंचा धिंगाणा ;विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड

शाळेच्या आवारात तसेच परिसरात अनेक टवाळखोर मुले थांबलेली असतात.
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsakal
Updated on

काळेवाडी: परिसरात रोडरोमिओंनी धिंगाणा घातला असून, येथील मुख्य चौक, शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेस, कॉलनीच्या प्रवेशाजवळ व चाळींच्या आवारात उभे राहून विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोंमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

काळेवाडी परिसरात अनेक शाळा-महाविद्यालय असून, अनेक क्लासही आहेत. येथे येणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमियोंच्या छेडखानीला सामोरे जावे लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शाळेच्या आवारात तसेच परिसरात अनेक टवाळखोर मुले थांबलेली असतात.

त्यातील काही मुलांचा शाळा अथवा महाविद्यालयांशी काहीही संबंध नसतो. मात्र, येथे येणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढण्यासाठी व त्यांना त्रास देण्यासाठी ही मुले घोळक्याने येथे थांबतात.

Pimpri-Chinchwad
Mumbai Local Train Update : कल्याण रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे पाहून अश्लील शेरेबाजी करणे, घाणेरडे हावभाव करणे, टोमणे मारणे, छेडछानी करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. कोणी जाब विचारला तर हे टोळके जाब विचारणाऱ्यालाच मारहाण करतात.

रोडरोमियो या ठिकाणी विनाकारण गाड्यांवर येऊन वेगवेगळ्या प्रकारचे बाईक स्टंट करणे, मोठमोठ्याने आरडाओरड करणे हे सततचे झाले आहे.

Pimpri-Chinchwad
Satara News : 'या' स्मशानभूमीत कावळे नव्हे, तर वानरे शिवतात नैवेद्य; कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

हे रस्त्याने जाणाऱ्या मुलींना कट मारतात. यात अनेकदा अपघात होऊन विद्यार्थिनी, महिला व लहान मुले जखमी झाली आहेत.

या सर्व प्रकारांमुळे नागरिक, महिला व मुलींमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून अनेक मुली शाळा महाविद्यालयात यायला तयार होत नाहीत. तर महिलाही या त्रासाने वैतागल्या आहेत. याविषयी पोलिसांनी गांभीर्याने पावले उचलून ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

यासाठी शाळा महाविद्यालयाच्या आवारात तसेच मुख्य चौकांमध्ये एक पोलिस पथक नियुक्त करावे. या रोडरोमियोंना जरब बसावी, यासाठी अशा टवाळखोरांना झोडपून त्यांची धिंड काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Pimpri-Chinchwad
Woman Kidnapping : महिलांच्या अपहरणांत २२ टक्के वाढ

टवाळखोर मुले गाड्या सुसाट चालवितात. कर्कश हॉर्न वाजवतात, वाकड्यातिकड्या गाड्या चालविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा बेशिस्तांवर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. या बाबत पोलिसांना सांगितल्यास, तुम्हीच फोटो काढून पाठवा, असे पोलिस सांगतात.

हरेश नखाते, नागरिक

नागरिकांनी निर्भीड होऊन ११२ क्रमांकावर संपर्क साधावा. तत्काळ पोलिस कर्मचारी त्याठिकाणी पोचतील. अशा टवाळखोरांची गय केली जाणार नाही. तसेच नागरिकांचे नावही गुप्त ठेवले जाईल.

गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.