Pimpri-Chinchwad : अत्यावश्यक सेवा वगळता सांगवीत कडकडीत बंद दापोडीत संमिश्र प्रतिसाद

एरव्ही गजबजलेल्या रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती.महा इ सेवा केंद्र,इतर खाजगी कार्यालये बंद ठेवण्यात आल्याने सांगवी परिसरात शुकशुकाट होता.
pimpri chinchwad
pimpri chinchwad sakal
Updated on

जुनी सांगवी - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या पिंपरी चिंचवड बंदला जुनी सांगवी,नवी सांगवीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर दापोडीत संमिश्र प्रतिसाद मिळाला.

जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी परिसरातील व्यापारी मंडळांना सकल मराठा कार्यकर्त्यांच्या वतीने बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले होते.आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातून बंदला पाठिंबा देण्यात आला.पिंपरी शहरातील मराठा मोर्चासाठी जाण्यासाठी शुक्रवार ता.८ सायंकाळ पासूनच शनिवारी सकाळी नवी सांगवी, जुनी सांगवी येथून ठिकठिकाणांहून कार्यकर्त्यांना एकत्रित येण्याचे निरोप समाज माध्यमातून देण्यात आले होते.

pimpri chinchwad
Pune News : महावितरणच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्याला फटका; तुटलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून गाय मृत्यूमुखी

सांगवी व्यापारी असोसिएशन,खाजगी कोचिंग क्लासेस, विविध सामाजिक संघटना,गणेश मंडळांनी सकल मराठा क्रांती मोर्चास पाठिंबा देत स्वतःहून दुकाने कार्यालये बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.

एरव्ही गजबजलेल्या रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती.महा इ सेवा केंद्र,इतर खाजगी कार्यालये बंद ठेवण्यात आल्याने सांगवी परिसरात शुकशुकाट होता.

pimpri chinchwad
Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणी कपातीचं टेन्शन होणार दूर; जाणून घ्या काय आहे तलावांची स्थिती?

शाळा- हॉस्पिटल सुरळीत सुरू - काही शाळांमधून ओपन डे असल्याने शाळकरी मुलांना घेऊन पालकांची एकमेव वर्दळ रस्त्यावर दिसून येत होती. बंद असल्याने अनेकांनी घरी राहणेच पसंत केल्याने एरव्ही रस्त्यावर असणारी वाहनांची तुरळक वर्दळ सुरू होती. गर्दीत वाट काढत धावणा-या स्कुल बस शिवाय रिक्षा धावताना दिसत होत्या.

बंदमुळे रिक्षा थांबे ओस- शहर बंद असल्यामुळे रिक्षा थांबे ही ओस पडलेल्याचे परिसरात चित्र होते.चाकरमानी मंडळी, खरेदीसाठी पडणारा नागरिक घराबाहेर पडणार नाही हे लक्षात घेऊन रिक्षा चालकांनीही रिक्षा घरी लावून घरीच राहणे पसंत केल्याने अनेक ठिकाणी रिक्षा थांबेही ओस पडल्याचे चित्र होते.

pimpri chinchwad
Pimpri-Chinchwad : कासाराची वाडी ते मल्टिट्रान्स्पोर्ट हब

सांगवी पोलिस प्रशासनाकडून ठिक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दापोडी परिसरात अपवाद वगळता बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

फोटो ओळ- जुनी सांगवी येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला बाजारपेठ बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()