वेळ दूपारी चारची. महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर आग लागते पाहता पाहता धुराचे मोठाले लोळ रुग्णालयाच्या बाहेर दूरवर पसरतात.
- बेलाजी पात्रे
वाकड - वेळ दूपारी चारची. महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर आग लागते पाहता पाहता धुराचे मोठाले लोळ रुग्णालयाच्या बाहेर दूरवर पसरतात. स्मोक डिटेकटर अलार्म वाजवून चोख काम बजावतात सर्वत्र अग्निशामकचे जवान, मावशी, ब्रदर्स, सिस्टर यांची पळाळ सुरू होते. आगीत अडकलेल्या रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्ध पातळीवर काम अन काही जवानांचा क्रेनच्या साहाय्याने चौथ्या मजल्यावरील आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असतो.
हा सर्व थरार पाहन्यासाठी रस्त्यावर मात्र बघ्यांची तोबा गर्दी उसळते पाहता पाहता आगीच्या ह्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरते सर्वांच्या मोबाइलमध्ये फोटो अन घटनेचे अपडेट्स येतात. मात्र, दीड तासाने सर्वांना हा मॉक ड्रिल असल्याचे समजताच घटना पाहणारे दर्दी आणि फोटो घेणारे मोबाईल बहाद्दर डोक्याला हात लावून पळ काढतात. होय हा सारा प्रकार गुरुवारी (ता. २०) दुपारी चार ते सहाच्या दरम्यान थेरगाव रुग्णालय आणि परिसरात घडला. निमित्त होते, अग्नि सुरक्षा सप्ताहाचे. केंद्र शासन, केंद्रीय गृह मंत्रालय व राज्य शासनाच्या आदेशान्वये महापालिका प्रशासनाचे जनजागृती अभियान सुरू आहे.
थेरगाव रुग्णालय प्रमुख व मॉकड्रिलचे इन्सीडन्ट कमांडर डॉ. अभय दादेवार यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी रुग्णालयात झालेल्या मॉक ड्रिल मध्ये चौथ्या मजल्यावर दहा डमी रुग्ण ठेवण्यात आले होते. चौथ्या मजल्यावर आग लागून धूर पसरताच अलार्म वाजला. तत्पूर्वी सर्व वार्डमधील रुग्ण व नातेवाईकांना हा डेमो असल्याच्या सूचना देण्यात आली होती. पिंपरी आणि थेरगाव अग्निशामक केंद्राचे सोळा जवान या मोहिमेत सहभागी झाले होते. यासह फ्लोअर मार्शल, वार्डन अन्य दहा ग्रुप नेेमुन त्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या होत्या. डमी रुग्णांना इतर वार्डमध्ये व चौघांना वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले.
प्रत्यक्षात रुग्णालयात खरीखुरी आगीची घटना घडल्यास त्यास कसे सामोरे जावे, काय-काय खबरदारी घ्यावी. कोणी काय जबाबदारी पार पाडावी याची रंगीत तालीम म्हणजेच हे मॉक ड्रिल होय. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईतील व्हिक्टोरिया डॉकयार्डात घडलेल्या दुर्देवी घटनेत शहीद झालेल्या ६६ जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ ते २० एप्रिल दरम्यान हा सप्ताह पाळला जातो त्यानिमित्त अग्नि सुरक्षे संदर्भात जनजागृती केली जाते, मार्गदर्शन शिबिरे, कार्यशाळा होतात. मॉकड्रिल होते. यावर्षी शहरात इंद्रायणी नगर येथील शाळेत, एलप्रो मॉलमध्ये, मनपा मुख्य इमारतीमध्ये मॉकड्रिल झाले असून शेवटचे मॉकड्रिल एका रााहीवाशी सोसायटीत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.