पिंपरी महापालिकेत मनुष्यबळ कमी; कंत्राटी कामगारांवर मदार

गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत नोकर भरती बंद आहे. मात्र, नियतवयोमानानुसार व स्वेच्छेने निवृत्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे मनुष्यबळ दर महिन्याला घटत आहे.
PCMC
PCMCSakal
Updated on
Summary

गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत नोकर भरती बंद आहे. मात्र, नियतवयोमानानुसार व स्वेच्छेने निवृत्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे मनुष्यबळ दर महिन्याला घटत आहे.

पिंपरी - गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत (Pimpri Municipal) नोकर भरती (Recruitment) बंद (Close) आहे. मात्र, नियत वयोमानानुसार व स्वेच्छेने निवृत्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे मनुष्यबळ (Man Power) दर महिन्याला घटत आहे. परिणाम, रिक्त जागांची संख्या वाढत असून कामकाजासाठी कंत्राटी कामगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यःस्थितीत अ, ब, क व ड या चारही पदांवरील विविध ३५५ संवर्गातील ११ हजार ५११ पदे सरकारकडून मंजूर आहेत. त्यातील चार हजार २४६ पदे रिक्त आहेत.

महापालिकेच्या नवीन आकृतिबंधानुसार एक आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे मंजूर आहेत. अतिरिक्त आयुक्ताची दोन पदे शासन नियुक्त व एक पद महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांसाठी आहे. सध्या ही चारही पदे भरलेली आहेत.

PCMC
तुटलेले संसार जोडणारी वाकडची ‘नवदुर्गा’ बेबीताई जाधव

सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, प्रशासन अधिकारी, शहर अभियंता, सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता आदी १२० संवर्गातील पदे अधिकारी श्रेणीतील आहेत. त्या २७९ पदांपैकी १६८ पदे भरलेली आहेत. त्यात १५२ पदे महापालिका सेवेतील व १६ पदांवर शासन नियुक्त अधिकारी कार्यरत आहेत. १११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका अधिकाऱ्याला दोन-तीन विभागांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

अशीच स्थिती ब वर्ग संवर्गातील अधिकाऱ्यांचीही आहे. त्यांच्या विविध ४७ संवर्गातील ३२४ मंजूर पदांपैकी २१५ पदे भरलेली आहेत. त्यात महापालिका सेवेतील २११ व शासन नियुक्त चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. १०९ पदे रिक्त आहेत.

शिक्षकांची ४९३ पदे रिक्त

महापालिका सेवेतील शिक्षकांचा समावेश ‘क’ गटात होता. महापालिकेच्या १०५ प्राथमिक व २४ माध्यमिक, अशा १२९ शाळा आहेत. त्यांच्यासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक, उपशिक्षक आदी ११ संवर्गातील एक हजार ६१४ पदे मंजूर आहेत. त्यातील एक हजार १२१ पदे भरलेली असून सर्व महापालिका सेवेतील आहेत. अद्याप ४९३ पदे रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.