पिंपरी - गंभीर व कृत्रिम श्वासोच्छ्वासाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी (Patient) महापालिकेने (Municipal) स्वतःच ऑक्सिजन निर्मिती प्लॅंट (Oxygen Production Plant) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील थेरगाव रुग्णालयातील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित नवीन जिजामाता, नवीन भोसरी, नवीन आकुर्डी रुग्णालयांसाठीचे प्रकल्प उभारणीची वर्क ऑर्डर दिली आहे. येत्या आठ दिवसांत तीनही प्रकल्पांचे यंत्र शहरात दाखल होऊन ते कार्यान्वित करण्याचे काम सुरू होईल. (Pimpri Chinchwad Municipal Oxygen Production Plant Making for Patients)
‘आमचे पेशंट सिरियस आहे. ऑक्सिजनची आवश्यकता आहे. आपल्याकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे का?’ अशी विचारणा एप्रिल महिन्यात अनेक रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात होती. ‘व्हेंटिलेटर आहे, पण ऑक्सिजन नाही,’ अशी स्थिती होती. त्यामुळे काही नामांकित खासगी रुग्णालयांना आपल्याकडील रुग्ण अन्य रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी बिकट परिस्थिती होती. कारण, कृत्रीम श्वासोच्छ्वास देऊन रुग्ण वाचविणे महत्त्वाचे होते. महापालिकेच्या वायसीएमसह सर्वच रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नव्हते. उत्पादक कंपन्याकंडूनही ऑक्सिजन सिलिंडर मिळत नव्हते. त्यामुळे महापालिकेने स्वतःच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांची वर्कऑर्डर गेल्या महिन्यात दिली. आता प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
असे आहे तंत्रज्ञान
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ‘पीएसए’ तंत्रज्ञानावर (प्रेशर स्विंग ॲड्झर्प्शन) आधारित आहे. अर्थात हवेतील ऑक्सिजन वेगळा करून रुग्णांना पुरवला जाईल. त्याची शुद्धता ९३ टक्के असेल. मागणी वाढल्यास या यंत्रणेद्वारे लिक्विड टॅंकमधील ऑक्सिजनही रुग्णांपर्यंत पुरवठा केला जाईल. थेरगाव रुग्णालयासाठीचे यंत्रसामग्री नेदरलॅंडची असून, उर्वरित प्रकल्पाची सामग्री कोईम्बतूर येथील कंपनीकडून घेतली आहे.
असे आहेत प्रकल्प
थेरगाव प्लॅंटची ऑक्सिजन निर्मिती क्षमता एक हजार ५० लिटर प्रतिमिनिट (एलपीएम) आहे. जिजामाता, भोसरी व आकुर्डी रुग्णालयांतील प्रत्येक प्रकल्पाची क्षमता ९६० एलपीएम आहे. चारही प्रकल्प मिळून तीन हजार ९३० एलपीएम क्षमता आहे. थेरगावचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित प्रकल्पांचे काम पुढील आठ दिवसांत सुरू होईल. प्रत्येक प्रकल्पांसाठी एक कोटी ४० लाख रुपये खर्च आला आहे.
जिजामाता, भोसरी, आकुर्डी प्रकल्पांची वर्क ऑर्डर
चारही प्रकल्पांची क्षमता ३,९३० लिटर प्रतिमिनीट
हवेतील ऑक्सिजन वेगळा करून रुग्णांना पुरवणार
थेरगाव रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते रुग्णसेवेसाठी उपलब्ध होईल. तेथील ऑक्सिजन प्लॅंटची सामग्री आली आहे. दोन दिवसांत काम पूर्ण होईल. नवीन आकुर्डी, नवीन जिजामाता व नवीन भोसरी रुग्णालयांसाठी ऑक्सिजन प्लॅंट उभारणीबाबत वर्क ऑर्डर दिली आहे. त्यासाठीचे साहित्य पुढील पाच दिवसांत पोचेल.
- मनोज लोणकर, उपआयुक्त, भांडार विभाग, महापालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.