Pimpri Chinchwad News : हिंजवडीतील मुळशी कट्ट्यावर मान्यवरांच्या गप्पांचा फड!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुळशी तालुक्यातील पूर्व भागातील विविध गहण समस्यांना वाचा फोडण्यासाठी हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात मुळशी कट्टाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सामाजिक व इथवरच्या यशस्वी जीवनातील संघर्षा गाथांनी पहिल्याच मुळशी कट्ट्यावर गप्पांचा चांगलाच फड रंगला होता.
mulashi katta
mulashi kattasakal
Updated on

Pimpri Chinchwad News : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुळशी तालुक्यातील पूर्व भागातील विविध गहण समस्यांना वाचा फोडण्यासाठी हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात मुळशी कट्टाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सामाजिक व इथवरच्या यशस्वी जीवनातील संघर्षा गाथांनी पहिल्याच मुळशी कट्ट्यावर गप्पांचा चांगलाच फड रंगला होता.

पिडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू सोहिनी गांगुली, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, टाटा इंजीनियरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या सीनियर सेक्रेटरी व समाजसेविका मोनिका जोशी, मुळशीतील जेष्ठ पत्रकार रमेश ससार यांच्यासह अन्य मान्यवर या महफिलीत सहभागी झाले होते.

पहिल्या-वहिल्या कट्ट्यावर मान्यवरांनी मनातील खदखद बोलून दाखवली तर काहींनी गप्पातून मन मोकळे केले. शिक्षकाचा मुलगा शिक्षकच का व्हावा या प्रश्नाला अनुसरून राज्यसेवा परीक्षांच्या यशस्वी पाठलाग, शिक्षक वडिलांची अपेक्षा, खेड्यातील तेंव्हाची परिस्थिती इत्यादीचा भावनिक उलगडा पोलीस अधिकारी थोरात यांनी केला

मुळशीचा इतिहास, सांप्रदायिक व कुस्तीचा वारसा, आयटी पंचक्रोशीतील वाहतूक कोंडी, पाणी समस्या, बकालीकरण, गुन्हेगारी, आयटीतील नोकऱ्यात स्थानिकांना प्राधान्य, समाजातील तरुण पिढीला लागलेलं सोशल मिडीयाच व्यसन इत्यादी विषयांवर उहापोह झाला प्रत्येकाने आपली व समाजाची जबाबदारी यावर भाष्य करत उपाय योजना सुचविल्या.

यानंतर सहभागी मान्यवरांनी त्यांच्या जीवनातील इथपर्यंतचा संघर्षदायी प्रवास, आयुष्यातील टर्निंग पॉईंट आणि आपल्या आयुष्याचे ध्येय यावर थोडक्यात भाष्य केले.

mulashi katta
Pimpri News : डोळे उघडण्यापूर्वीच बघितले भयानक जग!

चौकट

विविध क्षेत्रातील मान्यवरांना सामाजिक विषयांवर मनसोक्त गप्पा मारता याव्यात, समाजाला त्यांच्या अनुभवांचा फायदा व्हावा याकरीता प्रत्येक महिन्याला आयटी पार्क, पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील मान्यवरांना मुळशी कट्ट्यावर बोलावून विविध विषयावरील गप्पांच्या माध्यमातून विचार मंथन केले जाईल. माय मुळशी ह्या जन्मभूमीसाठी आवश्यक त्या विविध समस्यांवर विचारमंथन करून त्या सोडविण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाईल असे प्रतिपादन कट्ट्याचे प्रमुख समन्वयक संदिप जाधव यांनी केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.