Pimpri Chinchwad News: दादांच्या दौऱ्यामुळे ‘कही खुशी-कही गम’

‘राष्ट्रवादी’त उत्साह, भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची अनुपस्थिती
Pimpri-Chinchwad News
Pimpri-Chinchwad Newssakal
Updated on

Pimpri Chinchwad News: भारतीय जनता पक्ष-शिवसेना (शिंदे गट) युतीच्या सरकारमध्ये सहकाऱ्यांसह सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच काल पिंपरी-चिंचवड शहरात आले व कार्यकर्त्यांचा मेळावा, महापालिकेत बैठक घेतली. महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्टपणे ‘राष्ट्रवादी’च्या माजी नगरसेवकांनाही विकास कामे करताना विचारात घ्या, असा संदेश दिला आहे.

त्याचवेळी भाजपच्या काळात कोरोना काळात झालेल्या गैरकारभाराचे लेखा परीक्षण (ऑडिट) करायला सांगून भाजपवर कुरघोडीही केली आहे. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे भाजप-शिंदे गटात दबक्या आवाजात नाराजीचा सूर आहे.

भाजप-शिवसेना युतीसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) गेल्यानंतर सरकारप्रमाणेच शहरात स्थानिक पातळीवरही हा एकोपा दिसणे अभिप्रेत आहे. राज्यात आगामी काळात महायुती म्हणून लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविणार. परंतु; स्थानिक पातळीवर युती करायची की नाही, हे तुम्ही ठरवा, असे सूतोवाच अजित पवार यांनी मेळाव्यात केले.

Pimpri-Chinchwad News
Aurangabad Crime News: धक्कादायक! आरोपीला अटक करण्याठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकासह पथकावर हल्ला

मात्र, शहरातील भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील एकही पदाधिकारी अजित पवार यांच्या स्वागताला अथवा सत्काराला रावेत येथे आला नाही. हा संपूर्ण अजित पवार गटाचा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम असल्याचे चित्र होते.

मॅरेथॉन बैठकीत अनेक प्रश्‍न मार्गी

महापालिकेतील बैठकीलाही भाजप-शिवसेनेचा (शिंदे गट) एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता उपस्थित नव्हता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी माझी ही प्रशासकीय बैठक होती. मी कोणालाही बोलावले नाही. कार्यकर्त्यांना आपला नेता आल्यावर यावेसे वाटते.

Pimpri-Chinchwad News
AI मुळे लोकांचे जॉब जाणार नाहीत, पण...; संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमधून दिलासादायक निष्कर्ष

पत्रकारांनाही बोलविले नाही, असे उत्तर दिले. परंतु; मागील दोन- तीन दिवसात अजित पवार यांनी आपल्या स्वीय सहायकांमार्फत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या रखडलेल्या कामांची यादी मागवली होती. त्यामुळेच अजित पवार यांची महापालिकेतील मॅरेथॉन बैठक सुमारे साडेतीन तास चालली होती. प्रत्येक माजी नगरसेवकांना बोलावून, त्यांची कामे मार्गी लावण्याचे आदेश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटात उत्साह आहे.

मी काल आजारी होतो. त्यामुळे कुठे बाहेर पडलो नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (अजित पवार गट) कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे आम्हाला निमंत्रण नव्हते. तसा तो एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यक्रम होता. महापालिकेत प्रशासकीय बैठक घेतल्याचे आज वर्तमानपत्रातून कळाले.

- शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad News
Jalgaon Cyber Crime : विद्यार्थिनीचे मॉर्फिंग फोटो व्हायरल करुन बदनामी

भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही बोलावले नव्हते. अचानक कार्यक्रम ठरल्यामुळे त्यांच्याशी समन्वय साधण्यास वेळ मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम होता. महापालिकेत अजित पवार यांची बैठक असल्यावर कार्यकर्ते येतातच.

- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड

माझ्या नातीचा वाढदिवस असल्याने मी बाहेर होतो. शहराध्यक्ष नीलेश तरसही नाशिकला होते. आम्ही बहुतांश पदाधिकारी बाहेर गावी होतो. तसेच; आम्हाला निमंत्रणही नव्हते. समाज माध्यमांवरून कळाले. आम्ही शहरात असतो तर त्यांच्या स्वागताला गेलो असतो.

- बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.