Pimpri News : जखमी श्‍वानांसाठी ‘व्हॅन’ मिळेना; पशुवैद्यकीय विभाग कोमात

महापालिकेच्या ताफ्यात चार डॉग व्हॅन आहेत, मात्र त्या वारंवार नादुरुस्त असतात. एखादे भटके श्वान जखमी होवुन विव्हळत पडले असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते.
Dog
Dogsakal
Updated on
Summary

महापालिकेच्या ताफ्यात चार डॉग व्हॅन आहेत, मात्र त्या वारंवार नादुरुस्त असतात. एखादे भटके श्वान जखमी होवुन विव्हळत पडले असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते.

पिंपरी - ‘भटके श्वान जखमी अवस्थेत सापडले आहे’, हे सांगण्यासाठी ‘सकाळ’ प्रतिनिधीने ९ तारखेला सायंकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी पशुवैद्यकीय विभागाला संपर्क केला. परंतु, उपलब्ध असलेल्या क्रमांकापैकी एकाही क्रमांकावर फोन उचलण्यात आला नाही...असेच अनुभव शहरातील प्राणी-प्रेमींनाही येतात. डॉग व्हॅन व रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने ते स्वतःच्या दुचाकी किंवा इतर वाहनांमधून श्‍वानांना नेतात. त्यामुळे पशुवैद्यकीय विभाग कोमात आणि कर्मचारी ‘आउट ऑफ कव्हरेज’ अशी स्थिती आहे.

महापालिकेच्या ताफ्यात चार डॉग व्हॅन आहेत, मात्र त्या वारंवार नादुरुस्त असतात. एखादे भटके श्वान जखमी होवुन विव्हळत पडले असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते. त्यासाठी सामान्य नागरिक, सामाजिक संस्था किंवा प्राणीप्रेमींना व्हॅन हवी असते. परंतु ती मिळत नसल्याने नाइलाजाने दुचाकीवरून किंवा मिळेल त्या वाहनांवर पैसे खर्च करून दवाखान्यात घेवुन जावे लागते. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे एक लाख भटके श्वान आहेत. मोकाट जनावरांची संख्या त्याहून अधिक आहे. भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांकडून तक्रार आल्यास महापालिकेचे कर्मचारी पकडून त्यांना जवळच्या केंद्रात दाखल करतात. तेथे त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लस दिली जाते. काही दिवसांनंतर त्यांना पुन्हा त्याच भागात सोडण्यात येते. परंतु, या प्रक्रियेतून जाण्यासाठी मोठ्या सामना करावा लागतो.

पशुवैद्यकीय विभागातील ०२०-२७४२३७५५, ८०८०३५१६४८, ९९२२५०२३५५ या क्रमांकावर ‘सकाळ’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, कोणीही उत्तर दिले नाही. दोन वेळा कॉल करूनही त्यावर प्रतिसाद मिळाला नाही. दिवसभरात ‘सारथी’ या हेल्पलाइनवर आठ ते दहा कॉल, तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रमांकावर १० ते १५ कॉल सरासरी येतात. त्यावर डॉग व्हॅन उपलब्ध नाही किंवा नादुरुस्त आहे, विद्युतदाहिनी बंद आहे, असे सांगितले जाते.

फोनवरून कॉल व सारथीच्या माध्यमातून तक्रारी येतात. सध्या चार व्हॅन आहेत. सकाळी व संध्याकाळी दोन पाळींमध्ये त्या उपलब्ध असतात. वाहन कार्यशाळेने त्या पुरविलेल्या आहेत. इन्स्पेक्टरकडे किंवा काही कॉल मलाही येतात. स्वतंत्र असा दूरध्वनी क्रमांक नाही. बऱ्याच सामाजिक संस्था आणि नागरिकांचे कॉल दिवसभर असतात.

- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

खासगी संस्थांना डॉक्टर आणि उपचारांचा खर्च वेगळाच असतो. अशावेळी २०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत पैसे वाहतुकीसाठी मागितले जातात. एक रुग्णवाहिका सध्या उपलब्ध आहे.

- पुनीत खन्ना, पीपल्स फॉर ॲनिमल्स, पिंपरी-चिंचवड

मुक्या जनावरांच्या मदतीसाठी निधीची सर्वाधिक कमतरता आहे. सध्या आम्ही १०० ते १५० श्वान शेल्टरमध्ये सांभाळत आहोत. ज्या भागातून कॉल येईल त्या ठिकाणी आम्ही मदतीसाठी पोहोचतो. काही नागरिकांनीदेखील अशावेळी आपली चारचाकी वाहने उपचारासाठी उपलब्ध करावीत.

- रोहित आवाडे, पॉज फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.