पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा विस्तार वाढणार?

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आता पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर या पोलिस ठाण्यांच्या समावेशाच्या हालचाली सुरु आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा विस्तार वाढणार?
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police Commissionerate) आता पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर या पोलिस ठाण्यांच्या समावेशाच्या हालचाली सुरु आहेत. याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांनी पोलिस महासंचालकांकडे पाठवला आहे. यामुळे आयुक्तालयाचा विस्तार आणखी होणार असून आयुक्तालयाची हद्द थेट लोणावळा शहरापर्यंत पोहोचणार आहे. (Pimpri Chinchwad Police Commissionerate will be Expanded)

पुणे पोलिस आयुक्तालयातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, दिघी, सांगवी, वाकड, हिंजवडी पोलिस ठाणे तर पुणे ग्रामीणमधील देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी व चाकण पोलिस ठाण्यांचा समावेश करून १५ ऑगस्ट २०१८ ला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्वतंत्रपणे कार्यान्वित झाले. त्यानंतर चिखली पोलिस ठाणे नव्याने सुरू झाले. त्यानंतर चाकण पोलिस ठाण्यातील म्हाळुंगे, देहूरोड ठाण्यातील रावेत व तळेगाव दाभाडे ठाण्यातील शिरगाव या चौकींचे पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सरकारकडे पाठवला होता.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा विस्तार वाढणार?
माणुसकी अजूनही जिवंत!; अखेर वेदिकाला दिली १६ कोटींची लस

४ जानेवारी २०२१ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली. लवकरच हे पोलिस ठाणे कार्यान्वित होतील. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पुणे ग्रामीणमधील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर या पोलिस ठाण्यांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठवलेला आहे. या प्रस्तावास सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर आयुक्तालयाचा विस्तार वाढणार आहे.

गावांची संख्या

  • ४७ - वडगाव

  • ४३ - कामशेत

  • ४६ - लोणावळा ग्रामीण

  • लोणावळा शहर खंडाळा, कुरवंडे

  • ५ - पूर्वी समाविष्ट ठाणे

  • ४ - प्रस्तावित ठाणे

  • ४० लाख सध्याची लोकसंख्या

  • ४.५० लाख वाढीव लोकसंख्या

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा विस्तार वाढणार?
थेरगावात व्यावसायिकाचे अपहरण; सहा जणांना अटक

ग्रामपंचायतींचे ठराव घ्यावेत : अभिनव देशमुख

वडगाव मावळ : मावळातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या चार पोलिस ठाण्यांचा समावेश पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात करण्याबाबत कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी संबंधित पोलिस ठाण्यांना दिले आहेत. मावळातील देहूरोड, तळेगाव दाभाडे व तळेगाव एमआयडीसी या ठाण्यांचा समावेश पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात यापूर्वीच केला आहे. आता उर्वरित वडगाव, कामशेत, लोणावळा शहर व ग्रामीण या ठाण्यांचा समावेशही आयुक्तालयात करावा, असा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आयुक्तांनी राज्याच्या पोलिस महासंचालकाकांकडे सादर केला आहे. महासंचालकांनी या बाबत संबंधित ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याचा आदेश दिला होता. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख यांनी संबंधित ठाण्यांना ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याचे आदेश दिले आहेत. या ठाण्यांच्या समावेशानंतर संपूर्ण मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आधिपत्याखाली येणार आहे.

ग्रामीण हद्दीतील चार पोलिस ठाण्यांचा आयुक्तालयात समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठवला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. या भागाचा समावेश झाल्यास आणखी एक उपायुक्त, दोन सहायक आयुक्तांसह इतरही अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे.

- कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त-पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.