Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे

तरुणीच्या तोंडात मिर्ची पूड कोंबून गुप्तांगावर ओतली दारू ब्लेडने वार करीत फाडले कपडे
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad sakal
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. दिवसाढवळ्या ही रस्त्यावर फिरणे कठीण झाले आहे. तीन जणांच्या टोळक्याने तरुणीचा पाठलाग करून तिच्या तोंडात मिर्ची पूड कोंबली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी तिच्या गुप्तांगावर दारू ओतून ब्लेडने वार करीत अंगावरील कपडे फाडले. निगडी येथे भरदिवसाघडलेल्या या घटनेमुळे उद्योगनगरी हदरली आहे.

पीडित २७ वर्षीय तरुणीच्या बहिनेने दिलेल्या फिर्यादीनुसार चेतन मारुती घाडगे (वय 31, रा. गुरुद्वारा रोड, औंधगाव, पुणे) व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पीडित तरुणी गुरुदेवनगर येथून दर्शन करून येत होती. रस्त्यावर कणीस घेत असताना आरोपी घाडगे याच्या सांगण्यावरून तीन आरोपी तेथे आले. त्यापैकी एकाने 'काढ रे काढ कोयता काढ हिच्यावर वार कर ' असे म्हटल्याने तरुणी भीतीने पळत सुटली. पांढरकर सभागृहाच्या मागे, गुरुदेवनगर येथील सार्वजनिक शौचालयात शिरली. आरोपीही तेथे गेले.

त्यांनी तरुणीच्या अंगावर , गुप्तांगावर दारू ओतून मिर्ची पावडर खाऊ घातली. डोळ्यात मिरची पावडर टाकून ब्लेडने वार करीत तिचे कपडे फाडले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने उद्योगनगरी हदरली आहे. शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, तरुणी देत असलेली माहिती तसेच घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरची वस्तुस्थिती व स्थानिकांकडून मिळालेली माहिती यामध्ये विसंगती आढळत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()