Rahi Sarnobat : ऑलिम्पिकसाठी आयुर्वेद औषधी समाविष्ट कराव्यात

‘ऑलम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘ॲण्टी डोपिंग’ चाचणीत ठराविक ॲलोपॅथिक औषधे वापरण्यास परवानगी आहे. मात्र आयुर्वेदिक औषधांचा यामध्ये समावेश केलेला नाही.
Rahi Sarnobat
Rahi SarnobatSakal
Updated on
Summary

‘ऑलम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘ॲण्टी डोपिंग’ चाचणीत ठराविक ॲलोपॅथिक औषधे वापरण्यास परवानगी आहे. मात्र आयुर्वेदिक औषधांचा यामध्ये समावेश केलेला नाही.

पिंपरी - ‘ऑलम्पिक मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘ॲण्टी डोपिंग’ चाचणीत ठराविक ॲलोपॅथिक औषधे वापरण्यास परवानगी आहे. मात्र आयुर्वेदिक औषधांचा यामध्ये समावेश केलेला नाही. आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक औषधे आणि उपचारांचा ऑलिम्पिकसाठी समावेश करण्यात यावा. त्यासाठी आयुष मंत्रालयाने पाठपुरावा करावा.’ अशी अपेक्षा अर्जून पुरस्कार प्राप्त नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केली.

निगडी येथे ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात क्रीडा स्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने आयुर्वेद व्यासपीठ आणि महाराष्ट्रीय मंडळ यांच्या सहयोगाने दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद क्रीडा परिषदेचे आयोजन केले. या परिषदेचे उद्घाटन जामनगर विद्यापीठाचे निवृत्त प्रकुलगुरु डॉ. श्रीराम सावरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, आगाशे महाविद्यालयाचे डॉ. सोपानराव कांगणे, ज्ञान प्रबोधिनीचे सचिव सुभाष राव, मोहन गुजराथी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य मनोज देवळेकर यांनी लिहिलेल्या ‘विजेता’ डीकोडिंग दी न्युट्रिंग ऑफ ॲथलिट’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

खासदार बारणे म्हणाले, ‘आयुर्वेद उपचार पद्धती ही हजारो वर्षांपूर्वीची आहे. मेडिकल सायन्स कितीही पुढे गेले तरी आयुर्वेदाला जगन मान्यता मिळालेली आहे. या परिषदेमध्ये क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. याचा उपयोग पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल.’

डॉ. सावरीकर म्हणाले, ‘क्रीडापटूंच्या शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी योग उपचार आणि आयुर्वेदिक औषध उपचार उपयुक्त आहेत. क्रीडापटूंनी फसव्या उपचार पद्धती तसेच चुकीच्या मार्गदर्शकांपासून लांब राहिले पाहिजे. अन्यथा त्यांची कारकीर्द धोक्यात येऊ शकते.’

डॉ. सोनवणे म्हणाले, ‘विविध क्रीडा प्रकारांमध्ये आयुर्वेद आणि योगा उपचार पद्धती उपयुक्त आहे‌. शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी आयुर्वेद महत्त्वाची भूमिका बजावू शकते.’ दरम्यान यानंतर झालेल्या परिसंवादात तज्ज्ञांनी विविध क्रीडा प्रकारांसाठी आयुर्वेद औषधी, योगा, आहार आणि व्यायाम, उपचार या विषयांवर उपस्थितांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. प्राचार्य देवळेकर यांनी स्वागत केले. ॲड. प्रतिभा जोशी दलाल, सूत्रसंचालन डॉ. राजीव नगरकर यांनी केले. सुभाष देशपांडे यांनी आभार मानले.

गुरुकुल प्रमुख आदित्य शिंदे, डॉ. महेश देशपांडे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य उदय जोशी, वैद्य मेधा देवळेकर, वैद्य दीप्ती धर्माधिकारी, क्रीडा प्रशिक्षक भगवान सोनवणे कार्यक्रमाचे संयोजन केले.

मान्यवरांचा गौरव

परिषदेमध्ये अर्जून पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर, आंतरराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक शैलजा जैन, मिलिंद डांगे, नितीनभाई कारिया, महादेव कजगावडे, चंद्रशेखर कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, विजय पुरंदरे या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.