Pimpri News : माजी आमदारांच्या बंधूंच्या जागेतील अनधिकृत शेड पाडण्यासाठी टाळाटाळ

चिखली गाव येथील जागेत अनधिकृत शेड उभे केले आहे. हे अनधिकृत शेड राजकीय वरदहस्तामुळे उभे असल्याने महापालिका आयुक्त व संबंधीत अभियंता त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.
PCMC News
PCMC Newssakal
Updated on
Summary

चिखली गाव येथील जागेत अनधिकृत शेड उभे केले आहे. हे अनधिकृत शेड राजकीय वरदहस्तामुळे उभे असल्याने महापालिका आयुक्त व संबंधीत अभियंता त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.

पिंपरी - चिखली येथील गट क्रमांक व उपविभाग ९०५ मधील माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचे बंधू सुनील सुखदेव चाबुकस्वार यांच्या जागेतील अनधिकृत शेड पाडण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते व एमआयएमचे शहर उपाध्यक्ष दिपक कांबळे यांनी पाच महिन्यांपुर्वी दिले आहे. परंतु; पिंपरी चिंचवड महापालिकेतील बांधकाम परवाना विभागातून याबाबत टाळाटाळ केली जात आहे.

चिखली गाव येथील जागेत अनधिकृत शेड उभे केले आहे. हे अनधिकृत शेड राजकीय वरदहस्तामुळे उभे असल्याने महापालिका आयुक्त व संबंधीत अभियंता त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. हे शेड मागील वर्षापासून उभे करून त्यांनी भाड्यापोटी कोट्यावधी रुपये कमवून राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महापालिकेचा महसूल बुडवला आहे, असे कांबळे यांनी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांना दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी असणारे महापालिकाचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे आहेत. कारण तेही या कोट्यावधी रुपयांच्या कमवून देण्यात सहभागी आहेत, असा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे.

महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता यांनी या तक्रारीची दखल घेत दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे पत्र पाठवून पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी वर्ग केले आहे. मात्र; ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही केलेली नाही.

महापालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकाम करून व्यवसायाच्या भाड्यापोटी कोट्यावधी रुपयांचा आर्थिक फायदा करुन एकप्रकारे पाठबळच देत आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता उलट उच्च न्यायाल्याच्या आदेशाचा हा अवमान केला आहे. याबाबत लवकरात लवकर महापालिकेने कारवाई न केल्यास आपण महापालिकेसमोर उपोषणाला बसणार आहोत.

- दिपक कांबळे, माहिती अधिकारी कार्यकर्ता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.