Sakal NIE : मोबाईलमधून मुलांना बाहेर काढण्यासाठी ‘एनआयई’

कोरोनामधील ऑनलाइन शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ‘सकाळ’चा प्रयत्न.
Sakal NIE
Sakal NIESakal
Updated on

पिंपरी - कोरोनामधील ऑनलाइन शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मोबाईलच्या अतिवापरातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी सक्षमपणे प्रयत्‍न केले पाहिजे. त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन)चा अंक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा सूर मुख्याध्यापकांच्या चर्चेत उमटला. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या मोहातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक शाळांनी सकारात्मक विचारांतून विविध उपक्रम राबविण्‍याचा संकल्प यावेळी त्यांनी सोडला.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘सकाळ’तर्फे शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शाळांचे प्रतिनिधी म्हणून काही मुख्याध्यापक, शिक्षक प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी झाले. कार्यक्रमात ‘सकाळ’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक गिरीश तोकशिया, संतोष कुडले, ‘सकाळ’चे पिंपरी कार्यालयाचे सहयोगी संपादक जयंत जाधव, ‘सकाळ’एनआयई’चे सहव्यवस्थापक विशाल सराफ आदी उपस्थित होते.

Teacher
Teachersakal

श्री म्हाळसांकात महाविद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे म्हणाले, ‘‘कोरोनानंतर मुलांमधील संवेदनशीलता कमी झाली व टोकाची आक्रमकता आली आहे. मुलांचा लिखाणाचा वेग कमी झाला आहे. ‘सकाळ एनआयई’ अंकामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लिखाण कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. वाचन, लिखाणाची विद्यार्थ्यांना गोडी लावण्यासाठी सकारात्मक विचार करून उपक्रम राबविणे गरजेचे आहे.’

गीता मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्‍याध्यापक महेंद्र भोसले म्हणाले, ‘‘मुलांचे लेखन, वाचन कमी झाले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेत पत्रलेखन उपक्रम राबवत आहोत. आकलन संकल्पना लोप पावत चालली आहे. आकलनाचा पाया भक्कम झाला तर विद्यार्थी तयार होतील. गुणवत्तेबरोबरच विद्यार्थी संख्या सांभाळावी लागत आहे. मुख्याध्यापकांना शाळा व शाळाबाह्य सर्वच गोष्टी सांभाळाव्या लागतात.’

‘सकाळ एनआयई’ अंकाचे कौतुक

बदलत्या जीवनशैलीत मुलांवर वाचनाचे संस्कार करणारा, त्यांच्या कल्पकतेला वाव देणारा, सामान्यज्ञानात भर घालणारा, अशा शब्दात ‘सकाळ एनआयई’ अंकांचे मुख्‍याध्यापकांनी कौतुक केले. हा अंक मुलांबरोबरच अधिक पालकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्‍याध्यापकांनी सांगितले. ‘सकाळ’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक आदिनाथ कुचकर यांनी आभार मानले.

‘सकाळ एनआयई’ बैठकीस उपस्थित मुख्याध्‍यापक-शिक्षक

वैष्णवी देशपांडे (मुख्याध्यापक, सौ. राणूबाई नागूभाऊ बारणे माध्यमिक विद्यालय, वाकड), प्रिया पवार (मुख्याध्यापिका, सौ. राणूबाई नागूभाऊ बारणे प्राथमिक विद्यालय, वाकड), रागिणी देशपांडे (मुख्याध्यापिका, काशीविश्‍वेश्‍वर इंग्लिश मीडियम स्कूल, सांगवी), अशोक संकपाळ (मुख्याध्यापक, नृसिंह विद्यालय, सांगवी), अर्चना येळे (उपशिक्षिका, शिक्षण प्रसारक मंडळी मराठी प्राथमिक विद्यालय, निगडी), धनश्री सोनवणे (मुख्याध्यापिका, पी. के. इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर), आशालता कटके (मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिंजवडी), प्रा. प्रकाश पाबळे (मुख्याध्यापक, मॉडर्न हायस्कूल, निगडी), प्रा. सुनीता नवले (मुख्याध्यापिका, श्री फत्तेचंद विद्यालय, निगडी), हनुमंत मारकड (मुख्याध्यापक, श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्यू. कॉलेज, निगडी), मीनाक्षी दासरी (मुख्याध्यापक, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, निगडी), सुनीता मुखर्जी (मुख्याध्यापिका, श्रीमती गोदावरी माध्यमिक विद्यालय, आकुर्डी), भानुदास मालुसरे (मुख्याध्यापक, श्री म्हाळसांकात महाविद्यालय, आकुर्डी), राजू माळी (शिक्षक, श्रीमती गोदावरी माध्यमिक विद्यालय आकुर्डी), विक्रम काळे (मुख्याध्यापक, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल, चिंचवड स्टेशन), सोनाली दळवी (मुख्याध्यापिका, मनोरम प्राथमिक शाळा, चिंचवड), प्रियांका एरंडे (मुख्याध्यापिका, समर्थ माध्यमिक विद्यालय, चिंचवड), महेंद्र भोसले (मुख्याध्यापक, गीतामंदिर प्राथमिक शाळा, चिंचवड), उद्धव वाघमारे (मुख्याध्यापक, संचेती प्राथमिक विद्यालय, थेरगाव), शारदा शेटे (मुख्याध्यापक, कन्या विद्यालय, पिंपरीगाव), नेहा पवार (मुख्याध्यापिका, पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, नेहरूनगर), योगिता सात्रस (मुख्याध्यापिका, एम. एम. विद्यामंदिर, काळेवाडी), विजयश्री काजळे (मुख्याध्यापक, एम. एम. विद्यामंदिर, काळेवाडी), राजकुमार गायकवाड (मुख्याध्यापक, श्री सयाजीनाथ माध्यमिक विद्यालय, वडमुखवाडी), प्रेरणा गायकवाड (शिक्षिका, पी. के. इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर), शंकर शेटे (माजी मुख्याध्यापक).

मुख्याध्यापकांची निरीक्षणे

  • मुलांमधील संवेदनशीलता कमी झाली

  • आक्रमकता वाढली

  • लिखाणाचा वेग कमी झालाय

  • मुलांची आकलनक्षमता कमी झालीय

  • मुलांवर मूल्यसंस्कारांचा अभाव

  • मुलांचा एकलकोंडीपणा वाढलाय

  • सकारात्मक कृतीला पाठबळ द्या

  • शहरात शाळांमध्ये मैदानांचा अभाव

  • मुलांना पालकांनी वेळ द्यावा

  • तंत्रज्ञान चांगले; योग्य ठिकाणी वापरा

  • काय पाहावे; काय पाहू नये हे शिकवा

मोबाईल टाळण्यासाठी हे करा...

  • मुलांनी सकारात्मक कामाची दैनंदिनी लिहावी

  • शाळांमध्ये मोबाईल बंदी करा

  • शाळेत खेळ, योगाची गोडी वाढवा

  • एक दिवस आजी-आजोबांसोबत उपक्रम राबवा

  • शाळांमध्ये पालक बैठकीत समुपदेशकांचे मार्गदर्शन घ्यावे

  • शाळांमध्ये वाचनाचे उपक्रम राबवावेत

  • वाढदिवशी चॉकलेटऐवजी पुस्तके द्या

  • पालक सभा अनिवार्य केली पाहिजे

  • पालकांनी पाल्‍यासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावे

  • पालकांनी घरी मालिका, मोबाईलचा वापर कमी करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.