पिंपरी - दहावी-बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात चिंता आहे. दहावी, बारावीचा निकालही लागला आहे. आता पुढे काय? कोणत्या शाखेत ॲडमिशन घ्यायचं? करिअर कशात करायचं? असे करिअरविषयक अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहेत. त्यांचे उत्तर ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ मधून मिळणार आहे. चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) करिअरबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
मुख्य प्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, तर सहयोगी प्रायोजक लर्निंग लेन्स अकॅडमी, एमआयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हे आहेत. तर अौद्योगिक शिक्षण मंडळ, साई बालाजी एज्युकेशन सोसायटी, आय.आय.बी., मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्युट, नॅशनल फॉरेसिंक सायन्स युनिर्व्हसिटी, अलार्ड ग्रुप ऑप इन्स्टिट्युट, एम.आय.टी. ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, कमला एज्युकेशन सोसायटी, आय.आय.बी.एम., आचार्य ॲकॅडमी, ए.आय.सिटी, कारवर ट्रेनिंग, फ्रेमबॉक्स, टाईम्स् ॲण्ड ट्रेंडस् ॲकॅडमी, शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप-आंबी, मराठवाडा मित्र मंडळ, आयोजन स्कुल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, पेस आय. आय. टी. ॲण्ड मेडिकल या शैक्षणिक संस्थाचा सहभाग असून, कॉसमॉस बँक बँकिंग पार्टनर आहेत.
‘सकाळ एक्स्पो’ या शैक्षणिक प्रदर्शनाला अभिनेते संकर्षण कऱ्हाडे भेट देणार
`सकाळ विद्या एज्यु. एक्स्पो’ या शैक्षणिक प्रदर्शनाला ‘आम्ही सारे खवय्ये’चे सूत्रसंचालक आणि ‘तु म्हणशील तस’ या नाटकातील अभिनेते अभिनेते संकर्षण कऱ्हाडे भेट देणार आहेत. ते दुपारी तीन वाजता उपस्थिती लावणार आहेत. मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या भूमिकांमुळे सतत चर्चेत असतो. ‘तु म्हणशील तस’ या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, काजल काटे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात...
बीटेक एरोस्पेस अभियांत्रिकी, बीटेक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एमटेक एरोस्पेस अभियांत्रिकी, विमान देखभाल अभियांत्रिकी, शॉर्ट टर्म डिप्लोमा इन केबिन क्रू, एव्हिएशन मॅनेजमेंट, एअर तिकीट असे करिअर पर्याय आहेत. शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची २००१ पासून सुरवात झाली. उत्कृष्ट प्लेसमेंट, वर्गातील सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा लाइव्ह एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर, एअरक्राफ्ट इंजिन, एअरक्राफ्ट हँगर, २५ हून अधिक मॉकअप आणि प्रॅक्टिकलसाठी लॅब सुविधा आहे. ‘सकाळ विद्या एक्स्पो’च्या माध्यमातून प्रत्यक्षात माहिती मिळणार आहे.
- अंशुल बी. शर्मा, संस्थापक अध्यक्ष, शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे.
करिअर निवडताना अनेक संभ्रम निर्माण होतात. ऑनलाइन मिळणाऱ्या माहितीची विश्वासार्हता तुलनेने कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या विविध संधीची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचा योग ‘सकाळ विद्या एक्स्पो’च्या निमित्ताने जुळून आला आहे. डिजिटल युगात करिअरच्या अनेक वाटा उपलब्ध होत असताना पारंपरिक शिक्षण मागे पडताना दिसते, पालक आणि विद्यार्थ्यांना या नव्या शिक्षणाच्या संधी समजण्यासाठी ‘सकाळ विद्या एक्स्पो’ हे प्रभावी माध्यम ठरेल. गेली अनेक वर्षे आमचे सृजन कॉलेज ऑफ डिझाइन देखील यात सहभागी होत आहे.
- संतोष रासकर, कार्यकारी संचालक सृजन कॉलेज ऑफ डिझाइन.
सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये अनेक संस्था सहभागी झाल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मेडिकल, आयआयटी सारख्या क्षेत्रात तांत्रिक कौशल्ये तयार करण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ दिले जाते. ‘पेस ॲकॅडमी’कडून शैक्षणिक संधीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील पालक व विद्यार्थ्यांना करियरच्या विविध क्षेत्रातील संधीबाबत नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक पालक आणि विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देणे आवश्यक आहे.
- नीरज कुमार, ॲकॅडमिक हेड, पेस ॲकॅडमी आयआयटी आणि वैद्यकीय.
वारवडी गावात निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. येथे हॉस्टेलची सोय आहे. याठिकाणी ८० सीट आहेत. बारावीनंतर आर्किटेक्चर शाखेचा डिग्री कोर्स आहे. निवासी सोय आहे. कारण इथे विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव देण्यास शिकवले जाते. विद्यार्थ्यांचे ड्रॉइंग चांगले असणे आवश्यक आहे. ‘सकाळ विद्या एक्स्पो’ च्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना प्रबोधन करण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ विद्या एक्स्पो’मध्ये पालकांना भरपूर करीअरच्या संधीची नव्याने माहिती मिळणार आहे.
- सोनल निर्मळ, प्राचार्य, आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइन, पुणे.
काय? कधी? केव्हा? कुठे?
काय? - सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो
कधी? - १७ व १८ जून २०२३
केव्हा? - सकाळी १० ते रात्री ८
कुठे? - ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड
काय सांगता?
आता घेता येईल करिअरचा योग्य निर्णय
दहावी, बारावीनंतर ठरवा करिअरची दिशा
शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच छताखाली
विविध क्षेत्रातील करियरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
माहितीसाठी - संपर्क : ८३७८९८७८३६
उद्घाटन : सकाळी ११ वाजता
शुभहस्ते : शेखर सिंह, आयुक्त पिंपरी चिंचवड, महानगरपालिका
प्रमुख उपस्थिती : डॉ. गिरीष देसाई, कार्यकारी संचालक, पीसीईटी
प्रदर्शनाला भेट द्या आणि ‘लकी ड्रॉ’द्वारे मिळवा प्रत्येक २ तासाला आकर्षक भेटवस्तू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.