पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने पटकाविले पारितोषिक

‘इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज’ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश
Pimpri-Chinchwad Smart City won the award India Cycle for Change Challenge
Pimpri-Chinchwad Smart City won the award India Cycle for Change Challengesakal
Updated on

पिंपरी : चालणे, सायकल चालविणे, त्यातून परिवर्तन घडविणे आणि स्ट्रीट डिझाइन प्रकल्पांच्या प्रगतीला गती देण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि बंगळुरू स्मार्ट सिटी यांच्यातर्फे हेल्दी स्ट्रिट्स कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप घेण्यात आले. त्याअंतर्गत झालेल्या ‘इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज’ स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने पारितोषिक पटकाविले.

स्मार्ट सिटीज मिशनचे सहसचिव कुणाल कुमार, संचालक राहुल कपूर यांच्याहस्ते महापालिका कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार यांनी पारितोषिक स्विकारले. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवडने प्रवेश केला आहे. देशपातळीवरील या पुरस्कारामुळे शहराच्या ‍शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कर्नाटकचे नगरविकास मंत्री बिरथी बसवराज, नागरी भू वाहतूक संचालनालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा आयुक्त सुश्री मंजुला व्ही, अतिरिक्त मुख्य सचिव तथा बंगळुरू स्मार्ट सिटीचे अध्यक्ष राकेश सिंह, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चोलन, कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा चोलन आदी उपस्थित होते.

शहरांमध्ये उच्च दर्जाच्या रस्त्यांची रचना आणि त्यांचा अधिकाधिक लोकोपयोगात वाढ कशी होवू शकते, यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशनने बंगळुरू येथे दोन दिवसीय पहिल्या ‘हेल्दी स्ट्रीट्स कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप’चे आयोजन केले होते. यामध्ये प्रकल्प तज्ज्ञांचे सादरीकरण झाले. विविध शहराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतर्फे कार्यकारी अभियंता गायकवाड, उपअभियंता पवार, सल्लागार आशिक जैन यांनी सहभाग नोंदविला. देशातील ३७ शहरांतील १०० हून अधिक अधिकारी- मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अभियंते सहभागी झाले होते.

बंगळुरू येथील स्पर्धेमुळे चालणे आणि सायकल चालवणे यापेक्षा अधिक स्वच्छ हवा आणि वाहतुकीच्या अनेक पद्धतींसह शहराचा अनुभव घेण्याची संधी प्राप्त झाली. त्यातून शारीरिक व मानसिक आरोग्य, सक्रिय जीवनशैलीच्या शहरांमध्ये अधिक गुंतवणुकीचे पर्याय मिळू शकतात. पर्यावरण जागरूकतेसाठी नावीन्यपूर्ण विचार करायला हवा. समस्यांवर उपाय शोधून त्यांची अंमलबजावणी करायला हवी. शहरव्यापी परिवर्तन वाढवण्यासाठी महापालिका व स्मार्ट सिटीद्वारे नियोजन करीत आहे. केंद्र सरकारच्या अशा योजनेतून शहर लोकोपयोगी विकास साधू शकेल.

- राजेश पाटील, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.