E-Vehicle Charging Station : चार्जिंग स्टेशन उभारा; करसवलत मिळवा; प्रशासक शेखर सिंह यांचे आवाहन

लोकसंख्येबरोबच शहरात पेट्रोल व डिझेल वाहनांची संख्या पर्यायाने प्रदूषणही वाढत आहे.
pimple saudagar Park royal society E-Vehicle Charging Station
pimple saudagar Park royal society E-Vehicle Charging Stationsakal
Updated on
Summary

लोकसंख्येबरोबच शहरात पेट्रोल व डिझेल वाहनांची संख्या पर्यायाने प्रदूषणही वाढत आहे.

पिंपरी - लोकसंख्येबरोबच शहरात पेट्रोल व डिझेल वाहनांची संख्या पर्यायाने प्रदूषणही वाढत आहे. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महापालिकेने ई-वाहन वापरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मिळकतकराच सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणारे मिळकतधारक व गृहनिर्माण संस्थांना करसंकलन व करआकारणी विभागाद्वारे मिळकतकरात दोन ते पाच टक्के सवलत दिली जात आहे. पिंपळे सौदागर येथील पार्क रॉयल सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला असून, अन्य नागरिक व सोसायट्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी राज्याच्या नगर विकास विभागाने २० ऑगस्ट २०२१ रोजी ई-वाहन धोरण जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला होता. त्यानुसार ई-वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्याचा आदेश तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी एक जानेवारी २०२२ रोजी करसंकलन व करआकारणी विभागाला दिला होता. त्यानंतर ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या मालमत्ताधारकांना दोन टक्के आणि जिम, क्लब हाऊस अशा सामाईक मालमत्तांसह गृहनिर्माण संस्थांना पाच टक्के सवलत जाहीर केली आहे.

आमच्या सोसायटीत टाटा मोटर्स कंपनीचे कर्मचारी राहायला आहेत. त्यांच्याकडे चारचाकी ई-वाहने होती. त्यामुळे चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत कंपनीशी आम्ही संपर्क साधला. त्यांना जागा उपलब्ध करून दिली चार चार्जिंग युनिट बसवून दिले. बोल्ट कंपनीने ई-दुचाकीसाठी पाच चार्जिंग युनिट बसवून दिले आहेत.

- उदय साबदे, सचिव, पार्क रॉयल सोसायटी, पिंपळे सौदागर

चार्जिंग सुविधांमुळे मिळकतकर सवलत

  • स्वतःच्या ई-वाहनांसाठी उभारलेल्या चार्जिंग स्टेशनमधून इतर ई-वाहनांची चार्जिंग

  • २ % ५

  • गृहनिर्माण संस्थांमध्ये सामाईक सुविधांतर्गत सदस्यांना ई-वाहन चार्जिंगची सुविधा

चार्जिंग स्टेशन उभारणी अटी व शर्ती

  • गृहनिर्माण संस्थांनी मूळ पार्किंग वगळून स्वमालकीच्या मोकळ्या जागेत व्यापारी तत्त्वावर ई-वाहन चार्जिंग सुविधा उभारावी

  • आग, पूर अशा आपत्कालीन कामासाठी अडचणीची न ठरणाऱ्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारावे

  • ई-चार्जिंग स्टेशन व्यापारी स्वरूपाचे असले तरी त्याच्या मिळकत कराची आकारणी घरगुती दराने होईल

लागणारी कागदपत्रे

वैयक्तिक चार्जिंग स्टेशन

  • इतर ई-वाहनांसाठी चार्जिंग सुविधा दिल्यास मिळकतधारकांनी अर्जासोबत मिळकत मालकी हक्काची कागदपत्रे

  • चार्जिंग स्टेशन उभारलेले छायाचित्र

  • स्वतःच्या चार्जिंग स्टेशनमधून इतर ई-वाहनांना चार्जिंगची सुविधा देण्याबाबत साधे प्रतिज्ञापत्र

गृहनिर्माण संस्थांचे चार्जिंग स्टेशन

  • गृहनिर्माण संस्थांनी अर्जासोबत मिळकतींची मालकी हक्काची कागदपत्रे

  • चार्जिंग स्टेशन उभारल्याचे छायाचित्र

  • अन्य ई-वाहनांना चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा सोसायटीच्या मंजूर ठरावाची प्रत

दृष्टिक्षेपात शहर

  • सुमारे ३० लाख लोकसंख्या

  • २३,९२,५२१ वाहने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()