MPSC Exam : पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत ‘दिग्विजय’

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने आधार दिला. मावस काका डॉ. अशोक दिवेकर यांनी मार्गदर्शन केले.
Digvijay More
Digvijay Moresakal
Updated on

पिंपरी - वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने आधार दिला. मावस काका डॉ. अशोक दिवेकर यांनी मार्गदर्शन केले. त्याला स्वअध्ययनाची जोड देत राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचे आव्हान त्याने पेलले. त्यात यश मिळवत सहायक नगररचनाकार पदावर नावाप्रमाणेच ‘द्विग्विजय’ मिळवला. तोही पहिल्याच प्रयत्नात. जुनी सांगवीतील दिग्विजय विश्वास मोरे या तरुणाची ही यशोगाथा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

मुळचे वरंवड (ता. दौंड) येथील असलेले मोरे कुटुंबीय काही वर्षांपासून जुनी सांगवीत शितोळेनगरमध्ये राहात आहेत. त्यातील दिग्विजयने पहिल्याच प्रयत्नात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्यातून स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सर्व लक्ष स्पर्धा परीक्षकडे केंद्रीय केले. नगररचना विभागातच करिअर करायचे मनोमन ठरवले. त्यादिशेने अभ्यास सुरू केला. आणि पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले. सहायक नगररचनाकार पदावर त्यांची निवड झाली आहे. दिग्विजय यांचे वडील डॉ. विश्वास मोरे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई ज्योती मोरे डॉक्टर आहेत. लहान भाऊ स्थापत्य अभियांत्रिकीमध्येच पदविकेचे शिक्षण घेत आहे.

मी २०२१ मध्ये बीई सिव्हिल पदवीधर झालो. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्वअध्ययनावर भर दिला. कोणी जबरदस्ती करून किंवा कोणाच्या सांगण्यावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत नाही. त्यासाठी आपली मनापासून इच्छा असावी लागते. स्वतःची इच्छा असेल तर, आपोआपच यश मिळते.

- दिग्विजय मोरे, जुनी सांगवी

Digvijay More
Sakal Edu Expo : करिअर मार्गदर्शनासाठी विद्यार्थी व पालकांना चिंचवडमध्ये ‘सकाळ एज्यु एक्स्पो' चे आयोजन

कासारवाडीतील ‘अजिंक्य’ विजय

कासारवाडीतील ॲड. बबनराव बवले यांचे चिरंजीव ॲड. अजिंक्य बवले यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. राज्य सरकारच्या कामगार विभागात त्यांची ‘राजपत्रित अधिकारी वर्ग दोन’ पदावर निवड झाली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयातून त्यांनी बीएससी पदवी घेतली. त्यानंतर पुण्यातीलच यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयातून ‘एलएलबी’ केले.

जोडीला संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारीही केली. युपीएससीची परीक्षेने एक-दोनदा यशाची हुलकावणी दिली. पण, मागे न हटता अजिंक्य यांनी दोन्ही परीक्षांची तयारी सुरूच ठेवली. अखेर आता यश आले आहे. कामगार विभागातच काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()