Metro Work : पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो कामाला प्रारंभ

पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रोने प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण.
Metro Work
Metro Worksakal
Updated on

पिंपरी - पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रोने प्रवास करण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विस्तारित मेट्रोच्या मार्गाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ४.५१ किलोमीटर मार्गिकेचे काम अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मेट्रो मार्गीकेच्या पहिल्या टप्प्यात मोरवाडी पिंपरी ते फुगेवाडी असे काम करण्यात आले. त्यानंतर सिव्हल कोर्टपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात आला. तेथून पुढे स्वारगेटपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात आला. फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर सहा मार्च २०२२ रोजी तर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्गावर ऑगस्ट २०२३ प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. मात्र, स्वारगेट ते पिंपरी- चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती.

या विस्तारित मार्गाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने १६ डिसेंबर रोजी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन ६ मार्च रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले होते. त्‍यानुसार या कामाला आता सुरुवात झाली या कामाला सुरुवात झाली असून भक्ती-शक्ती चौक आणि पवळे ब्रीज येथे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.

सुरुवातीला माती परीक्षण करून ले-आउट तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर पिलर बांधण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि भक्ती-शक्ती चौक या स्थानकांचा समावेश असणार आहे.

मेट्रोचा मार्ग विस्‍तारीकरणाचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्‍यानुसार निगडीपर्यंत कामाला सुरुवात झाली ही शहरवासीयांची स्वप्नपूर्ती आहे. आगामी काळात हिंजवडी, वाकडे, पिंपळे सौदागर, चाकण, भोसरी असा मार्ग विस्‍तारण्यासाठी प्रयत्‍नशील राहणार आहे.

- महेश लांडगे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.