PMP Bus Accident : पीएमपी बसचे सहा महिन्यांत ३४ अपघात; अकरा जणांचा मृत्यू

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे अपघात वाढत आहेत. काही अपघातांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. काही गंभीर जखमी झाले आहेत.
pmp bus
PMP BusSakal
Updated on

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे अपघात वाढत आहेत. काही अपघातांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. काही गंभीर जखमी झाले आहेत. चालू वर्षात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ३४ अपघात झाले असून, यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातांमध्ये ठेकेदारांच्या बसने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच लगतच्या ग्रामीण भागातही बस सेवा पुरवली जातो. या बसगाड्या विविध मार्गावर धावतात. यामुळे प्रवाशांची सोय होते. दरम्यान, या बसचे किरकोळ तसेच मोठे अपघात होत आहेत. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्यालगत असलेले पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणामुळे अपघात होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

मात्र, अनेकदा पीएमपी बसवरील चालकाला गर्दीत वाहन चालवण्याच्या अनुभवाचा अभाव, बसवरील नियंत्रण सुटणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, यामुळे देखील अपघात होत असल्याचे समोर येते. तसेच इतर वाहन चालकांनी बससमोर अचानक वाहन थांबविणे, बीआरटी मार्गात अचानक खासगी वाहन घुसडणे. यामुळे बसचालकाचा गोंधळ उडतो. अशावेळी देखील अपघाताच्या घटना घडतात.

प्रवाशांचा खोळंबा

अनेकदा अपघात झाल्यानंतर गर्दी होते व बस थांबवली जाते. त्यामुळे प्रवासी ताटकळत थांबतात. पोलिस व पीएमपीचे अधिकारी मध्यस्थी करून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तोपर्यंत बसमधील प्रवाशांचा खोळंबा होतो.

अपघातात ठेकेदारी बस आघाडीवर

एकूण अपघातात ठेकेदारी बसच्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. मागील सहा महिन्यात ३४ अपघातांची नोंद झाली. यामध्ये खात्याच्या बसने ९ तर ठेकेदाराच्या बसने तब्बल २५ अपघात झाले आहेत. दरम्यान, ठेकेदाराच्या बसवरील चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.

तेरा जण गंभीर जखमी

सहा महिन्यांतील ३४ अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत. यासह १० जण किरकोळ जखमी झाले आहेत.

तीन महिन्यांतील अपघात

महिना - अपघात

  • जानेवारी - १०

  • फेब्रुवारी - ३

  • मार्च - ४

  • एप्रिल - ७

  • मे - ७

  • जून - ३

  • एकूण - ३४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.