हिंजवडी - हिंजवडी परिसरात पीएमआरडीए प्रशासनाकडून धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई सुरू झाली आहे. बुधवारी (ता.१९) रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडीमधील साखरे वस्ती येथे सुमारे १६०० चौ. फुटांचे धोकादायक होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. गुरुवारी (ता.२०) दुपारनंतर देखील कारवाईला सुरू होती. पुढील काही दिवस ही मोहीम चालूच राहणार आहे.
वाकड-हिंजवडी रस्त्यावर गुरूवारी दुपारनंतर ६० बाय ४० फुटांचे होर्डिंग काढण्याची कारवाई करण्यात आली. यासह अन्य एका महाकाय होर्डिंगवर कारवाई करण्याचे प्रस्तावित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत अनेक निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतर शहरातील विनापरवाना, धोकादायक, महाकाय होर्डिंग्जच्या विरोधात ‘सकाळ’ने आवाज उठवत बातम्यांची मालिका प्रसिद्ध केली होती.
त्यानंतर, महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासन खडबडून जागे झाले. संबंधित संस्थांनी सर्वेक्षण करत होर्डिंग्जची संख्या निश्चित केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने तात्काळ कारवाई करत अनेक होर्डिंग्ज काढून टाकले होते. मात्र, या कारवाईत पीएमआरडीए प्रशासन मागे होते. अखेर त्यांनी देखील आयटी पार्क हिंजवडी परिसरापासून धोकादायक होर्डिंग्ज हटविण्याच्या कारवाईला सुरूवात केली असून पुढील अनेक दिवस ही धडक कारवाई चालू राहणार आहे.
हिंजवडीतील तक्रारी आणि वादातील धोकादायक होर्डिंगवर प्रथम कारवाई करून मोहिमेला सुरूवात झाली आहे. हे होर्डिंग ४० बाय ४० फूट आकाराचे होते. पाऊस आल्याने तसेच काही काळ यंत्र बंद पडल्याने कारवाईला रात्र झाली. येत्या काळात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज हटविण्याचे आमचे नियोजन आहे.
- सचिन म्हस्के, तहसिलदार (कारवाई विभाग), पीएमआईडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.