ए गाडी कडेला घे, कागदपत्रे दाखव; पोलिस मित्रांची दादागिरी

पोलिस मित्रांची ही दादागिरी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. ही दादागिरी सुरू असताना तेथील पोलिस मात्र, बघ्याची भूमिका घेताना दिसून येतात.
ए गाडी कडेला घे, कागदपत्रे दाखव; पोलिस मित्रांची दादागिरी
Updated on
Summary

पोलिस मित्रांची ही दादागिरी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. ही दादागिरी सुरू असताना तेथील पोलिस मात्र, बघ्याची भूमिका घेताना दिसून येतात.

पिंपरी : ‘ए गाडी कडेला घे, कागदपत्रे दाखव’ अशी अरेरावीची भाषा करत लाठी उगारण्यापर्यंत पोलिस मित्रांचे धाडस वाढले आहे. पोलिस मित्रांची ही दादागिरी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. ही दादागिरी सुरू असताना तेथील पोलिस मात्र, बघ्याची भूमिका घेताना दिसून येतात. (police friends misconduct with citizens)

लॉकडाउनमुळे पोलिस प्रशासनावर आलेला ताण त्यात अपुरे मनुष्यबळ यामुळे पोलिसांची तारेवरची कसरत सुरू आहे. कोरोना नियमांचे पालन होण्यासह कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे, अशा दोन्ही कामांमुळे पोलिसांची दमछाक होते. यामुळे त्यांच्या मदतीला विशेष पोलिस अधिकारी, ग्राम सुरक्षा दल व पोलिस नागरिक मित्र संघटनेचे स्वयंसेवक दिले आहेत. ते पोलिस मित्र म्हणून काम करतात.

ए गाडी कडेला घे, कागदपत्रे दाखव; पोलिस मित्रांची दादागिरी
‘आभाळ’भर दुःख पचवूनही त्याची ‘आबाळ’च

आयुक्तालयांतर्गत असलेल्या पंधरा ठाण्यांना प्रत्येकी वीस विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तर एक हजार २७३ ग्रामसुरक्षा दलाचे स्वयंसेवकही आहेत. हे पोलिस मित्र पोलिसांसोबत काम करताना हद्दीत शांतता, सुव्यवस्था राखणे, शासकीय आदेशाची अंमलबजावणी, कोरोनाबाबत जनजागृती, नाकाबंदी, पेट्रोलिंग आदी कामे करतात. यादरम्यान नागरिकांशी सौजन्याने वागण्यासह त्यांची मदत करणे व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करणे, अपेक्षित आहे. मात्र, नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिस अधिकारी, कर्मचारी निवांत बसलेले असताना पोलिस मित्रांचीच दादागिरी पाहायला मिळते.

जबरदस्तीने वाहन अडवून, कागदपत्रे तपासणे, गाडीची चावी काढून घेणे, कारवाईची धमकी देणे, नागरिकांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे पाहायला मिळते. अशा पोलिस मित्रांना आवर घालण्याची मागणी होत आहे.

ए गाडी कडेला घे, कागदपत्रे दाखव; पोलिस मित्रांची दादागिरी
रुग्णांसाठी महापालिकेने स्वतःच उभारला ऑक्सिजन निर्मिती प्लॅंट

काय आहेत आयुक्तांचे आदेश :

- पोलिस मित्र नागरिकांवर लाठी उगारणार नाहीत, अरेरावी करणार नाहीत.

- पोलिस मित्रांनी जनतेशी कसा संवाद करावा, याबाबत पोलिस ठाणे प्रमुख मार्गदर्शन करून प्रशिक्षण देतील.

- नाकाबंदीच्या वेळी पोलिस मित्रांसोबत पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी असतील.

- नागरिकांशी नम्रतेने संवाद साधून त्यांच्याशी सौजन्याने वागण्याबाबत मार्गदर्शन करावे.

- ओळख पत्र शर्टच्या खिशाला ठळकपणे लावावे.

- नाकाबंदीच्या ठिकाणी विनाकारण वाहन अडवून नागरिकांना त्रास होईल, असे वर्तन करू नये.

आयुक्तालयांतर्गत असलेले पोलिस मित्र :

विशेष पोलिस अधिकारी - ३००

ग्राम सुरक्षा दल - १ हजार २७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.