Police Recruitment : पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी आजपासून भरती

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी तब्बल १५ हजार ४२ उमेदवारांनी अर्ज केले.
Police Recruitment Candidate
Police Recruitment Candidatesakal
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी तब्बल १५ हजार ४२ उमेदवारांनी अर्ज केले असून, बुधवारपासून (ता. १९) भोसरीतील इंद्रायणीनगर येथील मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे प्रभारी पोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रामानंद म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल येथे मैदानी चाचणीसाठी पहिल्या दिवशी ५०० उमेदवार असतील. त्यानंतर दररोज १२०० उमेदवार आणि ५ जुलै रोजी १६२० उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. याच मैदानावर उमेदवारांचे शारीरिक मोजमाप होणार आहे.

तेथे पिण्याचे पाणी, फिरते प्रसाधनगृह, खाद्यपदार्थांचे स्टॉल, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरीता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल; तर अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल.’

पालखी सोहळ्यांमुळे भरती प्रक्रियेत खंड

भरती प्रक्रियेच्या काळात देहू आणि आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळा आहे. हे दोन्ही सोहळे शहरातून मार्गस्थ होणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे, २५ जून ते ३० जून या कालावधीत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात येणार आहे.

शहरात प्रथमच मैदानी चाचणी

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर यापूर्वीही पोलिस भरती प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, आयुक्तालयाच्या जागेच्या अडचणीमुळे या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी पुण्यात झाली. परंतु, आता प्रथमच शहरातील भोसरी येथे मैदानी चाचणी होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये दोन तृतीयपंथी उमेदवारांचाही समावेश आहे.

भरती प्रक्रियेसाठी नियोजन...

  • बुधवार (ता.१९) पासून ते १० जुलैपर्यंत भरती प्रक्रिया चालणार.

  • उमेदवारांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार.

  • गैरप्रकार रोखण्यासाठी ३९६ पोलिस अधिकारी, अंमलदार यांची नेमणूक.

  • पावसामुळे मैदानी चाचणी न झाल्यास उमेदवारांना पुढील तारीख मिळणार.

  • उमेदवारांच्या अडचणींचे निरसन स्थानिक पातळीवर होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.