करंजगाव (ता. मावळ) : माळीण गावाची ती घटना आजही अनेकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. दरड कोसळल्याने गावाचं होत्याचं नव्हतं झालं. दरडीखाली आख्खं गाव दाबलं गेलं. जवळच्या गावांना त्या ठिकाणी गावं होतं, हेही कळायला मार्ग नव्हता. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणातून प्रशासनाने धडा घ्यायला हवा. मात्र, मावळातील अनेक गावांमध्ये माळीणसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. असे असताना सरकारकाडून कुठलंही पाऊल उचललं जात नाही, हे दुर्दैव आहे. आगामी काही दिवसांत पावसाला सुरुवात होईल. मात्र, पावसामुळे जीव मुठीत घेऊन जगणारी ही लोकं कधी मोकळा श्वास घेतील का, हा प्रश्न अधोरेखित करणारा आहे.
नाणे मावळातील भाजे, पाटण, ताजे, बोरज, देवघर, वेहेरगाव, शिलाटणे, जेवरेवाडी, देवले, नेसावे, पाले, करंजगाव (मोरमारेवाडी), जांभवली, घोणशेत, साई व वाऊंड या गावांचा माळीणसदृश्य गावांत समावेश होतो. प्रामुख्याने पाले या गावात दरड कोसळण्याचा धोका जास्त आहे. ही गावे आज जीव धोक्यात घालून जीवन जगत आहेत.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मावळातील काही कटू आठवणी...
जुलै 1989 मध्ये भाजे येथे पहाटे दरड कोसळून गाव झोपेत असताना गाडलं गेलं. त्यात 49 लोकांना जीव गमवावा लागला. आंबेगाव तालुक्यातील माळीणमध्ये जुलै 2014 मध्ये पहाटे तीनच्या सुमारास दरडी कोसळली होती. त्यात सुमारे 150 नागरिकांचा बळी गेला. या सारख्या अनपेक्षित घटनांनी गावांचा बळी जातोय. मावळात झालेले अवैध उत्खनन, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी झालेले भूसंपादन, बेसुमार झालेली वृक्षतोड, धनिकांनी बांधकामासाठी केलेला निसर्गाचा ऱ्हास, अशा अनेक कारणांमुळे नैसर्गिक प्रवाह बदलले आहेत. विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गावांमध्ये हे बदल दिसत आहेत. डोंगर, दऱ्या-खोऱ्यातील या गावांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे. नाहीतर आगामी काळात माळीणच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
पाले येथील कड्याला दोन वर्षांपूर्वी वीज पडून चीर पडली होती. त्यानंतर शासनाच्या वतीने ग्रामसभा घेऊन पुनर्वसनासंबधीत चर्चा झाली. पुनर्वसन करण्याबाबत लोकांची सहमती आहे. लोकांनी पुनर्वसन करणे कोठे सोयीचे आहे. त्यादृष्टीने काही गट नंबरदेखील सुचविले आहेत. गावातील एका ब्राम्हण काकांनी स्वतःची तीन ते चार एकर जमीन देण्याचेही जाहीर केले आहे. याबाबत सर्व माहिती तहसीलदारांना दिली आहे. परंतु, अद्याप आम्हाला पुढील काही सूचना मिळाल्या नाहीत.
- ऊर्मिला रविंद्र शेलार, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, करंजगाव
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
निसर्ग चक्रीवादळाने निसर्गाचे रौद्ररूप गावकऱ्यांनी अनुभवले. त्यामुळे पुढे जाऊन डोंगराचा कडा ढासळला, तर संपूर्ण गावच दाबल जाईल. त्यासाठी पुनर्वसन झालं पाहिजे. परंतु, त्याही अगोदर धनिकांकडून डोंगरावर होणारे दगडाचे उत्खनन थांबवले पाहिजे.
- अनिल गवारी, ग्रामस्थ, पाले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.