सोलापूरमधून प्रणिती शिंदे 
तर माढ्यातून मोहितेंचा विजय

सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर माढ्यातून मोहितेंचा विजय

Published on

सोलापूर, ता. ४ : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील तर सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे दणदणीत मताधिक्याने विजयी झाले.
प्रणिती शिंदे यांनी ७४ हजार १९८ मताधिक्याने विजय मिळविला आहे. मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा, सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाने त्यांना मोठे मताधिक्य दिले. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना अक्कलकोट, सोलापूर दक्षिण व सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्य मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
धैर्यशील मोहिते-पाटील हे १ लाख २० हजार ७६० मतांनी विजयी झाले.
त्यांना माळशिरस, माढा, करमाळा या विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांच्या फलटण व माणमधून मोठे मताधिक्य न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.