पंतप्रधान मोदी दौरा : तुकोबारायांचे मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद

देहूनगरी छावणीमय; मंदिर परिसरात पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे. वाहतूक मार्गातही बदल केले आहेत.
Prime Minister Narendra Modi visit Shri Sant Tukaram Maharaj Shila Mandir temple closed for darshan
Prime Minister Narendra Modi visit Shri Sant Tukaram Maharaj Shila Mandir temple closed for darshansakal
Updated on

पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरलोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १४) देहूत येत आहेत. लोकार्पणानंतर दुपारी बारा वाजता संवाद सभा होईल. यामुळे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त असून, परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मंदिर परिसरात पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे. वाहतूक मार्गातही बदल केले आहेत.

असे आहे नियोजन

देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत २२ एकरच्या मैदानात सभा होईल. त्यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी स्क्रीनही उभारल्या आहेत. या ठिकाणापासून जवळच तीन हेलिपॅड उभारले आहेत. दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधानांचे आगमन होईल. मोटारीने परंडवाल चौक, मुख्य कमानीमार्गे ते चौदा टाळकरी कमानीपर्यंत पोहोचतील. तेथून मुख्य मंदिरापर्यंत मंडप उभारला आहे. त्यात कॉरिडॉर आहे. त्यातून मुख्य मंदिरात आगमन होईल. दोन्ही बाजूला उभे चारशे वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत करतील. मुख्य मंदिरातील दर्शन व शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान माळवाडी येथील सभास्थळी रवाना होतील. मुख्य मंदिर ते माळवाडी सभास्थळ अंतर दीड किलोमीटर आहे. दरम्यान, हवामान खराब असल्यास विमानतळापासून मोटारीने देहूपर्यंत येण्याची पर्यायी व्यवस्थाही केली आहे.

संस्थान व प्रशासनाची जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थान, ग्रामस्थ आणि देहू नगरपंचायतीने जय्यत तयारी केली आहे. देऊळवाड्यात संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याबाबत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीनमहाराज मोरे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. देऊळवाड्यातील मंदिरांची डागडुजी, रंगरंगोटी केली आहे. रविवारी (ता. १२) संपूर्ण मंदिर धुऊन सॅनिटायझर फवारले आहे. सोमवारी फुलांची सजावट केली जाईल. चारशे टाळकऱ्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांचे देऊळवाड्यात आगमन होईल. सर्वांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. संस्थानच्या सात विश्वस्तांची रॅपिड टेस्ट केली आहे. तीन विश्वस्त वारकरी संवाद सभेला व तीन विश्वस्त देऊळवाड्यात उपस्थित असतील.

देहू प्रवेशद्वार कमान ते देऊळवाड्यापर्यंत नगरपंचायतीने रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. देहू ते माळवाडी रस्त्यावरील खड्डे बुजविले असून, दोन्ही बाजूने मुरूम टाकून साईडपट्ट्या भरल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील कमान पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलाने धुवून स्वच्छ केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. प्रशांत जाधव, तहसीलदार गीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत. माळवाडी येथील वारकरी संवाद सभेसाठी मंडप उभारले आहेत. जवळच सार्वजनिक बांधकाम खात्याने हेलिपॅड उभारले. तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी आहेत.

संवाद सभास्थळी जाण्याचा मार्ग

  • चाकण-तळेगाव रस्ता व आळंदी रस्त्याने येणाऱ्या भाविकांना विठ्ठलवाडी येथून नवीन बायपास रस्त्याने आल्यानंतर जुन्या पालखी मार्गाने सभास्थळी जाता येईल

  • देहूरोड मार्गे येणारे भाविक झेंडेमळा येथील रस्त्याने येतील

  • सभा स्थळापासून दीड किलोमीटरवर ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था

  • गावातून जाणारे भाविक जुन्या पालखी मार्गाने जातील

बंद राहणारे रस्ते व पर्यायी मार्ग

  • मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कमान ते देहूगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.

  • निगडीतील भक्तिशक्ती चौक- त्रिवेणीनगर- तळवडे- कॅनबे चौक पर्यायी मार्ग

  • तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक- महिंद्रा सर्कल रस्ता वाहनांसाठी बंद राहील

  • तळवडे गावठाण-चिखली ते डायमंड चौक ते मोईगाव मार्गे निघोजे एमआयडीसी पर्यायी मार्ग

  • तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा येथून देहू मार्ग; परंडवाल चौक ते देहू कमान रस्ता व्हीआयपी वाहनांव्यतिरिक्त बंद

  • देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक बंद

  • साईराज चौक- सांगुर्डी फाटा- परंडवाल चौक व भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर रस्ता बंद

पोलिस बंदोबस्त

  • उपायुक्त १०

  • सहायक आयुक्त २०

  • पोलिस निरीक्षक २५

  • सहायक निरीक्षक २९५

  • कर्मचारी २,२७०

असा असेल दौरा

  • झेंडेमळा मैदानावरील हेलिपॅडवर आगमन

  • मोटारीने देहूतील मुख्य मंदिराकडे रवाना

  • श्री संत तुकाराम महाराज मंदिराबाहेर वारकऱ्यांकडून स्वागत

  • मुख्य मंदिरात आगमन

  • विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन

  • ध्वजपूजन

  • श्रीराम दर्शन

  • महादेव दर्शन

  • पश्चिमेकडील पान दरवाजातून इंद्रायणी नदीसह भंडारा, घोरवडी व भामचंद्र डोंगराचे दर्शन

  • शिळा मंदिरात श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा

  • मंदिर कोनशिला अनावरण

  • अभंग गाथा दर्शन

  • विश्वस्त समितीकडून सत्कार

  • माळवाडी येथील सभास्थळी रवाना

  • सभास्थळी व्यासपीठावर आगमन

  • स्वागत व सत्कार

  • मंदिराचे लोकार्पण (बटन दाबून )

  • प्रमुख पाहुण्यांचे भाषण

  • पंतप्रधानांचे भाषण

  • समारोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.