मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगारांची पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून धरपकड

उर्से टोल नाका येथे गुन्हेगारांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
Crime
CrimeSakal
Updated on

पिंपरी : मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी गाडी अडविली असता दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. यादरम्यान पोलिस व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी पाच दरोडेखोरांना जाग्यावरच ताब्यात घेतले तर काही जण डोंगराळ भागात पसार झाले. पसार झालेल्यांपैकी चौघांना काही तासातच ताब्यात घेतले. तर इतर पसार दरोडेखोरांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. हा थरार मावळ तालुक्यातील उर्से टोलनाका येथे घडला.

या घटनेत पोलिस शिपाई शुभम तानाजी कदम हे जखमी झाले. तर कमलसिंग सुघनसिंग हाडा (वय ६१), भवानी हडमंत चौहान (वय ४०), निखिल घेकरसिंग गोडन (वय ३४), अरविंद चौहान (वय ३५), कुंदन चौहान (वय ३३), लोकेश चौहान (वय ३५), संजय केसरशाहू गुदेन (वय ३२), अंतिम कल्याण सिसोदिया (वय २३, सर्व रा. जि . देवास, मध्यप्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

मध्यप्रदेश येथील दरोडेखोरांची टोळी दोन मोटारीतून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाणार असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुंडा विरोधी पथकाने गुरुवारी (ता. २०) सकाळी साडे अकराच्या सुमारास उर्से टोल नाका येथे सापळा रचला. दरम्यान, मध्यप्रदेशची पासिंग असलेली एक संशयित गाडी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना दिसली . ही गाडी अडवून त्यातील पाच दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी एक गाडी येताना दिसली. (Pimpri Crime News)

Crime
स्वराज्य शपथभूमीवर भारतीय टपाल खात्याकडून विशेष टपाल पाकिटाचे अनावरण

ती गाडी टोलनाक्यावरून पुढे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. गाडीने दिलेल्या धडकेत पोलिस शिपाई कदम हे जखमी झाले. त्यानंतर ही गाडी विरुद्ध दिशेला वळली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर ही गाडी काही अंतरावर गेल्यानंतर त्यातील दरोडेखोर महामार्गालगतच्या डोंगराळ भागात पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकासह सामाजिक सुरक्षा पथक , गुन्हे शाखा, स्थानिक ठाण्याचे कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण डोंगराळ भाग पिंजून काढला. पोलिसांनी काही तासातच चार जणांना ताब्यात घेतले. तर इतर एक ते दोन दरोडेखोरांना शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. या दरोडेखोरांवर मध्यप्रदेशमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Crime
'फायझर'चे कोविड औषध घटक बायोफोर इंडिया कडून विकसित

परिसरात नाकाबंदी

दरोडेखोर पळालेला डोंगर द्रुतगती मार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्हींच्या मध्ये आहे. दरम्यान, डोंगरात पळालेला दरोडेखोर दुसऱ्या बाजूने रस्त्यावर येऊन पसार होण्याची शक्यता असल्याने दोन्ही मार्गावर तातडीने नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, महामार्गालगत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. व सर्वजण डोंगराच्या दिशेने लक्ष ठेवून होते. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पोलिसांच्या गाड्या उभ्या असल्याने येथून वाहनातून जाणारे नागरिक टोलनाक्यावर चौकशी करीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()