Pune Mumbai Expressway : तुम्ही कारवाई करा; आम्ही थांबणारच! ट्रक, अवजड वाहने उभी करणाऱ्यांची मुजोरी

वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करूनही द्रुतगती मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे व रस्त्यात कोठेही वाहने उभे करण्याचा प्रकार अद्याप सुरूच आहे.
Express Way Vehicles stop
Express Way Vehicles stopsakal
Updated on

सोमाटणे - वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करूनही द्रुतगती मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे व रस्त्यात कोठेही वाहने उभे करण्याचा प्रकार अद्याप सुरूच आहे.

द्रुतगती मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालणाऱ्या वाहनचालकाला जरब बसावी व यातून अपघाताचे प्रमाण शून्यावर यावे, यासाठी नवीन वर्षाच्या सुरवातीपासून रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलिस व आरटीओ यांच्यावतीने विशेष दंडात्मक मोहीम राबवणे सुरू करण्यात आली.

या उपक्रमाअंतर्गत अपघातग्रस्त ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, स्पीड गणच्या साह्याने वेग मोजणे, वाहतूक नियम मोडणारे व रस्त्यात वाहने उभे करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणे सध्या सुरू आहे. या उपाययोजना काटेकोरपणे राबवल्या जात असतानाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रकार थांबलेला नाही. दंड भरू पण वाहतूक नियम मोडू असा पवित्रा वाहनचालकाचा असल्याचा दिसतो. दंडात्मक कारवाई करूनही अति वेग, लेन कटिंग, शीट बेल्ट न वापरणे, रस्त्याच्या कडेला वाहने उभे करण्याचा प्रकार थांबलेला नाही.

Express Way Vehicles stop
Police Recruitment : सख्ख्या भावा-बहिणीची पोलिस भरतीत एकाच वेळी निवड; आईच्या आनंदाला ‘भरते’

परिणामी अपघाताचे प्रमाण शून्यावर येण्याऐवजी वाढले आहे. चार एप्रिल ते १९ मे या कालावधीत उर्से टोल नाका येथे (किलोमीटर ८० ते ८२) दरम्यान एकाच जागेवर एकाच प्रकारे तीन वेगवेगळे अपघात झाले. यात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. पोलिस सूत्रांच्या मतानुसार वाहतूक नियम मोडण्याचा प्रकार थांबवण्यासाठी दंडात्मक कारवाई बरोबर वाहन परवाना काही दिवसांसाठी रद्द करण्याची शिक्षा करण्याची गरज आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई सुरू आहे.

- अमोल पोवार, पोलिस उपनिरीक्षक, महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.