Ring Road : ‘डीपीआर’ रखडला; रिंगरोडला ‘ब्रेक’

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही.
ring road
ring roadsakal
Updated on

पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही. सध्या केवळ पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. त्यासाठी संयुक्त मोजणी झाली आहे. मात्र, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजुरीअभावी रिंगरोड कागदावरच असल्याची वस्तुस्थिती आहे. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनाच लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवून हे काम मार्गी लावल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्याची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल.

‘पीएमआरडीए’कडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या बाहेरून ग्रामीण हद्दीतून वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड) काम सध्या प्राथमिक स्तरावरच आहे. या रस्त्यामुळे ४० गावे जोडले जाणार आहेत. या मार्गाची एकूण लांबी ८२.३८ किलोमीटर आहे. रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी सध्या डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अंदाजे ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील सोळू ते वडगाव शिंदे या अंतरातील प्रत्यक्ष काम सुरू होऊन ते पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.

रिंगरोडची संयुक्त मोजणी करून ‘डीपीआर’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. लवकरच या कामाला गती मिळेल. सोळू ते निरगुडी या

पहिल्या टप्प्यातील साडेपाच किलोमीटर रिंगरोडचे काम केले जाणार आहे.

- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए

1) प्रस्ताव १९९७ चा, तरीही...

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आणि इतर शहरांमधून पुण्यात येणारी अवजड वाहतूक वळविण्याच्या दृष्टिकोनातून रिंगरोड हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. पुणे जिल्हा प्रादेशिक योजनेत २५ नोव्हेंबर १९९७ रोजी रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला. मात्र, तब्बल २५ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही हा रिंग रोड अद्याप कागदावरच आहे.

2) रुंदी ११० वरून ६५ मीटर

परंदवडी (ता. मावळ) ते सोळू (ता. खेड) या ४० किलोमीटर अंतरात रिंग रोड केला जाणार आहे. एकूण ८२.३८ किलोमीटर अंतरात ६५ मीटर रुंदीचा रस्ता असेल. रिंग रोड सुरुवातीला ११० मीटर रुंदीचा करण्यात येणार होता. मात्र, नागरिकांचा विरोध झाल्याने त्याची रुंदी ६५ मीटर निश्चित करण्यात आली आहे.

3) पहिल्या टप्प्याचे भूसंपादन रखडले

रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे या सुमारे ५.४० किलोमीटर अंतरात काम केले जाणार आहे. त्यासाठी सध्या विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव आले आहेत. या रस्त्याच्या ६५ मीटर रुंदीसाठी लागणारी जागा संपादित केली जाणार आहे. अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. निरगुडी, वडगाव शिंदे या गावांमध्ये रिंगरोडसाठी वनविभागाची २६ हेक्टर जागा आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

‘पीएमआरडीए’चा रिंगरोड

  • राज्य सरकारकडून सर्व मान्यता

  • एकूण भूसंपादन १४०० हेक्‍टर

  • रिंगरोडची रुंदी कमी करण्याचा निर्णय. ६५ मीटर रुंदी

  • पहिल्या टप्प्यात वाघोली ते सोलापूर रस्त्यादरम्यान ३२ किलोमीटर लांबीच्या कामाला सुरुवात अपेक्षित

  • रस्त्याचे काम कासवगतीने सुरू

टप्पानिहाय प्रस्तावित कामे

1) रिंगरोडसाठी निधी उपलब्ध होईल, तसतशी कामे केली जाणार असून, टप्पानिहाय विकास करण्याचे नियोजन आहे

2) पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे हे काम होईल

3) ‘पीएमआरडीए’कडून वाघोली येथून पुणे-नगर रस्त्याने पुणे-सोलापूर रस्त्यापर्यंत काम केले जाईल

4) दुसऱ्या टप्प्यात वडगाव शिंदे- लोहगाव-वाघोली हे काम पुणे महापालिका करणार आहे

5) पुणे-सोलापूर रस्ता ते पुणे-सासवड रस्ता (वडकी) आणि पुणे-सासवड रस्ता ते नवीन पुणे-सातारा रस्ता (दरी पुलाजवळ) असे काम पूर्ण होईल

6) वारजे- भूगाव- बावधन- सूस-हिंजवडी एमआयडीसी-परंदवडी असा रिंग रोड

7) परंदवडी (ता. मावळ) ते सोळू (ता. खेड) हा ४० किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विकसित करणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()