गेल्या शुक्रवारी (ता. ०३) सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या भुमिपुजन कार्यक्रमावर भाजपाने बहिष्कार टाकला होता.
तळेगाव स्टेशन - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह मावळातील इतर विकासकामांचे कोनशिला अनावरण झालेल्या ठिकाणी दुसर्याच दिवशी गोमूत्र व पंचामृत शिंपडून भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे निषेध नोंदविला.
गेल्या शुक्रवारी (ता.०३) सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या भुमिपुजन कार्यक्रमावर भाजपाने बहिष्कार टाकला होता. त्यानंतर भुमिपुजन झालेल्या जागेवर गोमुत्र शिंपडून भाजपा कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केले.
पवना बंद जलवाहिनी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मारेकर्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी शुक्रवारी तळेगाव दाभाडे शहरामध्ये सभा झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खऱ्या अर्थाने अक्कल असेल तर बारामतीमध्ये गेल्या ५० वर्षांपासून १८ गावांमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.तिथे अक्कल वापरून पाणी मिळवून द्यावे.मावळच्या जनतेला मावळमध्ये येऊन अक्कल शिकवू नये असे माजी राज्यमंत्री संजय भेगडे याप्रसंगी बोलताना म्हणाले.
पोलिसांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश देणा-यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.तसेच नगरपरिषद इमारतीच्या शासकीय भुमिपुजन कार्यक्रमात राजकीय कार्यक्रम घेतल्याचा आरोप करत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.
अॅड.रविंद्र दाभाडे,शांताराम कदम,नितीन मराठे,संदीप काकडे,राजेंद्र जांभुळकर,चंद्रकांत शेटे,रविंद्र माने यांच्यासह आंदोलनस्थळी जमलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झेंडे हातात घेऊन निषेधाच्या घोषणा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.