पिंपळे सौदागरातील दोन हॉटेलवर छापे

रात्री उशिरापर्यंत सुरू; सामाजिक सुरक्षा पथकाकडून २४२ जणांवर कारवाई
crime news
crime newssakal media
Updated on

पिंपरी : कोरोना (corona) नियमांचे उल्लंघन करीत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पिंपळे सौदागर येथील दोन हॉटेलवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (pimpri chinchwad police) सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये हॉटेल चालक-मालक, कर्मचारी व ग्राहक अशा एकूण २४२ जणांवर कारवाई करण्यात आली.

कोरोनाकाळात (corona) रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास मनाई असतानाही, उशिरापर्यंत हॉटेल सुरू असून त्याठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पहिली कारवाई पिंपळे सौदागर येथील साई चौकातील स्पॉट १८ नावाच्या मॉलमधील आठव्या मजल्यावरील योलो बार अँड रेस्टो येथे शनिवारी (ता. १४) रात्री साडेअकरा वाजता करण्यात आली.

येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमवून मद्यविक्री करताना दिसून आले. याप्रकरणी बार चालक-मालक समीर अनिल वाघ (वय ३४, रा. पूर्णानगर, चिंचवड), हॉटेलचा मॅनेजर आसिफ सिकंदर देसाई (वय ३३), बार टेंडर संकेत राजेंद्र झगडे (वय २९), पांडुरंग देविदास केदारे (वय २३), कॅप्टन सुशांत सुगतपाळ सकपाळ (वय २९), कर्मचारी सुशांत दिलीप साबळे (वय २४), सुभजीत प्रबीररंजन दास (वय २१, सर्व रा. साई चौक, पिंपळे सौदागर), कुक संदेश प्रकाश वाघमारे (वय २१, रुपीनगर), अमित भीमसेन सिंह (वय २६, रा. चिखली), डीजे चालक रोहित सुरेंद्र राऊत (वय २९, रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ७४ हजार २०० रुपयांची रोकड जप्त केली. तसेच, ११३ ग्राहकांवर दंडात्मक कारवाई ५६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

crime news
अफगाणिस्तानातील घडामोडींचा भारतावर परिणाम होईल?; जाणून घ्या तज्ज्ञांची मतं

दुसरी कारवाई याच इमारतीतील १८ डिग्रीज रूफ टॉप रेस्टो अँड लॉज या हॉटेलवर पावणेबाराच्या सुमारास करण्यात आली. येथेही कोरोना नियमांचे उल्लंघन केले. या कारवाईत हॉटेल मालक नीरज ज्ञानेश्‍वर नेवाळे (वय २९, रा. नेवाळे वस्ती, चिखली), मकरंद हरिश्चंद्र भोकरे (वय ३८, रा. भाऊसाहेब कलाटेनगर, वाकड), प्रकाश नारायण गोस्वामी (वय २६), पिंटू जयदेव मन्ना (वय ३९), मुरली श्रीमान गोमवंशी (वय २२), विकास जहाल शर्मा (वय २२), अरुण जगदेव ठाकूर (वय २८), बिरबहादूर उदयसिंग बोहरा (वय ४१), जॉन्सन डानसिंग गुरंग (वय २५), नरबहादूर चंद्रबहादूर पुन (वय ३०), ललित टेकबहादूर राणा (वय २३, सर्व रा. जगताप डेअरी, पिंपळे सौदागर), मनोज झरे (वय ३३, रा. चिखली), विशाल मुऱ्हे (रा. सोमाटणे फाटा), प्रशांत कैलास भुजबळ (वय ३५, रा. भुजबळ वस्ती, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्याकडून एक लाख ४० हजारांची रोकड जप्त केली. तसेच, १०५ ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करून ५२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()