Juni Sangvi : मुळा-पवनेच्या संगमावरील जुनी सांगवी

पवना-मुळा नद्यांच्या संगमावर जुनी सांगवी वसलेली आहे. पूर्वी कौलारू घरे, चिरेबंदी वाड्यांची वस्ती होती. नंतर चाळींनी टुमदार निसर्गाच्या सान्निध्यात सुंदरतेने नटलेले गाव होते.
Shri Gajanan Maharaj Mandir
Shri Gajanan Maharaj Mandirsakal
Updated on

पवना-मुळा नद्यांच्या संगमावर जुनी सांगवी वसलेली आहे. पूर्वी कौलारू घरे, चिरेबंदी वाड्यांची वस्ती होती. नंतर चाळींनी टुमदार निसर्गाच्या सान्निध्यात सुंदरतेने नटलेले गाव होते.

पुणे व पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार आणि मध्यवर्ती ठिकाण अशी त्याची ओळख. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरून आलेल्या नागरिकांनी जुनी सांगवीला पसंती दिली आहे. संगमावरील गाव ते उद्योगनगरीचे महत्त्वाचे उपनगर असा विकासात्मक बदल गावाने पाहिला आहे. प्रशस्त रस्ते, मोठमोठी उद्याने, मंदिरे, मठ गावात आहेत.

जुनी सांगवीपासून हाकेच्या अंतरावर विद्येचे माहेरघर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. पश्चिमेला हिंजवडी आयटी पार्क आहे. पूर्वेला खडकी बाजार आहे. दापोडीतील पुलामुळे पिंपरी-चिंचवड शहराशी गावे जोडले आहे.

शिस्तप्रिय, सण, उत्सव, सांस्कृतिक व आध्यात्मिक ठेवा जपणारी सांगवी, अशी पंचक्रोशीत ओळख आहे. येथील बहुतांश कुटुंबातील व्यक्ती खडकीच्या दारुगोळा कारखान्यात नोकरीसाठी होते आणि आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सांगवी परिसरात इंग्रजांनी लष्करी कॅम्प उभारला. त्याला औंध कॅम्प नावाले ओळखले जाते.

त्यामुळे मधुबन सोसायटीपर्यंतची शेती लष्कराने ताब्यात घेतली होती. तो परिसर आजपर्यंत लष्करासाठी कायम राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर गावात एस.टी. कर्मचारी वसाहत उभारली. १९६५ पासून गृहप्रकल्पांची अर्थात सोसायटी किंवा अपार्टमेंट बांधकामांना सुरुवात झाली.

१९६९ पर्यंत मुख्य रस्ते नसल्याने गावाला दळणवळणाचे साधन नव्हते. सायकल, बैलगाडी, वैयक्तिक टांगे होते. दापोडीत किंवा पुणे-मुंबई महामार्गाने जाण्यासाठी नावेतून जावे लागायचे. काही काळ तराफ्यासारखा तरंगता पूल व त्यानंतर सरकारने छोट्या बंधारा वजा पुलाची निर्मिती रहदारीसाठी केली.

१९८६ मध्ये जुनी सांगवी गाव महापालिकेत समाविष्ट झाले. त्यानंतर येथील लोकप्रतिनिधींच्या मार्फत विकास पर्वाची सुरुवात झाली. गेल्या ३०-३५ वर्षात सांगवीचे प्रशस्त स्मार्ट उपनगर बनले. रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इंदिरा गांधी प्रसुतीगृह, मध्यवर्ती भागातील ७६ गाळ्यांची प्रशस्त भाजी मंडई, पाण्याची टाकी, महापालिकेची करसंकलन इमारत, महापालिका शाळा, मुख्य चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा, वसंत दादा पाटील हयात असताना उभारला त्यांचा अर्धाकृती पुतळा आहे.

पुढील काळात मॉडेल वॉर्ड संकल्पनेतून शहरातील पहिली पर्यावरणपुरक स्मशानभूमी, सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यांची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनचा इतिहास कोरीव म्युरल्स भिंतीशिल्पाद्वारे सांगणारे शिवसृष्टी उद्यान, मुळा नदी काठावरील मधूबन येथील भव्य छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, संत गोरोबा कुंभार उद्यान, संत सावतामाळी उद्यान, पवना नदी काठावरील वेताळ महाराज उद्यान ही पाच उद्याने; ध्यान केंद्र शिवसृष्टी उद्यानात आहे.

दापोडी-सांगवी जोडणारा पूल आहे. मुळा नदीवरील छत्रपती संभाजी महाराज (स्पायसर रस्ता) पूल, राजीव गांधी पूल, औंधला जोडणारा छत्रपती महादजी शिंदे पूल व दोन्ही शहरांना जोडणारा सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपूलामुळे रहदारी सुखकर झाली आहे. या पुलांमुळे सांगवीच्या सौंदर्यात भर पडली आहे. नव्याने सुरू असलेल्या मुळा नदीवरील सांगवी बोपोडी पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

गावाविषयी थोडेसे...

घराणी - शितोळे, ढोरे, पवार, ढमाले, पोंगडे, ठाकर, शिंदे, कांबळे, माकर, कुंभार, सुतार, कदम

मंदिरे - ग्रामदैवत वेताळ महाराज मंदिर, १८० वर्षं जुना महानुभाव पंथाचा श्रीकृष्ण मंदिर मठ, पुरातन शंकर मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, संत श्री गजानन महाराज मंदिर, लक्ष्मी मंदिर, प.पू.बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित श्रीदत्त आश्रम, जयमालानगर येथील श्री अय्यप्पा स्वामी मंदिर.

वाडा संस्कृती - शितोळे वाडा, हांडे वाडा, पोलिस पाटील वाडा, कुंभार वाडा, पोंगडेवाडा

आळी - वाड्यांच्या बाजूला कुंभार आळी, ढोरे आळी, रामोशी आळी अशी गावाची रचना

वसाहती/सोसायट्या - एसटी कामगार, वेताळ महाराज, मधुबन, सातपुडा, बुद्धघोष, मृत्युंजय, उष:काल, जयराज आदी सोसायट्या

शिक्षण - अरविंद एज्युकेशन सोसायटीचे मराठी व इंग्रजी माध्यम शाळा व महाविद्यालय; मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीचे नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची शकुंतलाबाई शितोळे शाळा, नूतन माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमिक शाळा, महापालिकेची होळकर शाळा, शहीद अशोक कामटे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र

सांगवीत विविध प्रांतांतून आलेले नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. सध्या अद्यावत क्रीडांगण व मध्यवर्ती बसस्थानकाची उणीव आहे. भविष्यात याचीही उपलब्धता अपेक्षित आहे.

- रवींद्र निंबाळकर, अध्यक्ष, सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ

सांगवीला आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा आहे. गेल्या पंचवीस वर्षांत गाव ते उपनगर या प्रवासात सांगवी प्रशस्त स्मार्ट उपनगर झाले आहे. यातूनच नवी सांगवीची निर्मिती झाली आहे.

- विजयसिंह भोसले, स्थानिक रहिवाशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()