‘मेट्रोच्या भोसरी स्थानकाचे 
नाशिक फाटा नामकरण करा’

‘मेट्रोच्या भोसरी स्थानकाचे नाशिक फाटा नामकरण करा’

Published on

पिंपरी, ता. २६ : पुणे महामेट्रोच्या नाशिक फाटा येथील रेल्वे स्थानकाला भोसरी असे नाव दिले आहे. वास्तविक नाशिक फाटा या स्थानकापासून भोसरी हे पाच किलोमीटर दूर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळ होत आहे. नाशिक फाट्यावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना या मेट्रो स्थानकावर उतरून भोसरीला पाच किलोमीटर लांब जावे लागत आहे. तरी या स्थानकाचे नाव भोसरीऐवजी नाशिक फाटा असे करावे, जेणेकरून प्रवाशांचा गोंधळ होणार नाही, अशी मागणी रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या बाबत महामेट्रोला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मेट्रो रेल्वे स्थानकावर सर्व ठिकाणी नावात बदल करून ‘नाशिक फाटा’ असे नामकरण करावे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांशीही रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया व विद्यमान अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे यांनी चर्चा केली. त्यांनी याबाबत वरिष्ठ व्यवस्थापनाला कळवून त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. या मेट्रो रेल्वे स्थानकाचे नाव न बदलल्यास रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरीच्यावतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल, असे पगारिया यांनी पत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.