Revival of Rivers : नद्यांच्या पुनरुज्जीवनाला अडसर; सरकारच्या पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पडून

मुळा, पवना आणि इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यांचा विस्तृत प्रकल्प अहवालही (डीपीआर) तयार आहे.
Revival of Rivers
Revival of Rivers sakal
Updated on

पिंपरी - मुळा, पवना आणि इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यांचा विस्तृत प्रकल्प अहवालही (डीपीआर) तयार आहे. मात्र, राज्य सरकारच्या पर्यावरण समितीकडून पर्यावरणीय मंजुरी (ईसी - एन्व्हार्मेंट क्लिअरन्स) अभावी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झालेली नाही. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात यातून मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विकासाचा रन-वे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची सीमा मुळा नदीमुळे निश्चित झाली आहे. म्हाळुंगे पाडळे येथून नदी पुण्यात तर, वाकड येथून पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत प्रवेश करते. आयटी नगरी माण-हिंजवडीलाही नदीचे सानिध्य लाभले आहे. जुनी सांगवी- बोपोडी- दापोडी येथे पवना नदी मुळा नदीला मिळते.

तेथून पुढे पुण्यातील संगमवाडी येथे मुठा नदीशी मुळेचा संगम होतो. पवना नदी पिंपरी-चिंचवडच्या मध्यातून वाहते. मामुर्डी येथून तिचा शहरात प्रवेश होता. इंद्रायणी नदीमुळे शहराची उत्तर सीमा निश्चित झाली आहे. नदीच्या उत्तरेस ‘पीएमआरडीए’ची हद्द आहे.

नद्यांची स्थिती

संत तुकाराम महाराज यांचे देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी ही तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या तर, महासाधू मोरया गोसावी यांचे चिंचवड हे तीर्थक्षेत्र पवना नदीच्या काठावर आहे. पवनाचा संगम मुळा नदीशी होतो. या तीनही नद्यांमध्ये घरगुती व औद्योगिक सांडपाणी मिसळते. त्यामुळे तीनही नद्या प्रदूषित झाल्या आहेत.

आर्थिक तजवीज

मुळा नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे अर्थात महापालिका निधी उभारण्यात आले आहेत. पवना आणि इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. नदी प्रदूषण कमी करून जैवविविधतेत सुधारणा करण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे.

अशा नद्या, अशी स्थिती

मुळा नदी

मुळा नदीचा अधिकांश भाग पुणे महापालिका हद्दीत येत असल्याने नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तरीत्या करण्यात येणार आहे. पुण्याच्या दृष्टिने नदीची लांबी ४४.४० किमीतर, पिंपरी हद्दीत १४.२० किमी आहे. नदी पुनरुज्जीवनासाठी ७५० कोटी रुपये रकमेचा प्रकल्प अहवाल तयार आहे. पहिल्या टप्प्यात वाकड ते सांगवीपर्यंत ८.८० किमीसाठी ३२० कोटी रक्कमेचा प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन आहे.

पवना नदी

पिंपरी-चिंचवड हद्दीत पवना नदीची मामुर्डीपासून जुनी सांगवीपर्यंतची लांबी सुमारे २४.४० किलोमीटर आहे. तिच्या पुनरुज्जीवनासाठी एक हजार ४८४ कोटी रुपये रकमेचा प्रकल्प अहवाल तयार आहे. हा प्रकल्पही यावर्षी हाती घेण्याचे नियोजन आहे. या नदीवरच रावेत येथे बांधलेल्या बंधाऱ्यातून शहरासाठी अशुद्ध पाण्याचा उपसा केला जातो. निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर शहरात पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो.

इंद्रायणी नदी

पिंपरी-चिंचवड हद्दीत इंद्रायणी नदीची सुमारे २०.६० किलोमीटर लांबी आहे. तिच्या पुनरुज्जीवनासाठी एक हजार १०७ कोटी रुपये रकमेचा प्रकल्प अहवाल तयार आहे. हा प्रकल्पही या आर्थिक वर्षात हाती घेण्याचे नियोजन आहे. इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन आणि संवर्धनाचा प्रकल्प राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला आहे. जल मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे हा प्रस्ताव आहे. त्याला मान्यता मिळणे आवश्यक आहे.

वारकऱ्यांची आस्था ‘इंद्रायणी’

  • वारकऱ्यांसाठी इंद्रायणी नदी आस्थेची बाब आहे. गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्प तयार

  • नदी पात्र स्वच्छ करणे व शुद्धीकरण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, नदी काठावरील मुख्य ठिकाणी रिव्हरफ्रंट्स विकसित करण्याची योजना

  • नदीतून जलवाहतूक विचाराधीन असून, त्यासाठी प्रणाली पुरविण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्याचे नियोजन आहे.

  • नदीच्या दोन्ही काठांवरील एकूण ५४ गावे आणि शहरांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी गावागावांत सांडपाणी प्रकल्प उभारणे

  • लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी नगरपरिषदा; वडगाव व देहू नगरपंचायती; देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ४९ ग्रामपंचायतींचा समावेश

  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ५७७.१६ कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर

पवना व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रस्तावाची पर्यावरणीय मंजुरी (ईसी-एन्व्हार्मेंट क्लिअरन्स) अंतिम टप्प्यात आहे. पर्यावरण समिती नव्याने स्थापन झाल्यानंतर पर्यावरणीय मंजुरी मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन कामाला चालना मिळेल. मुळा नदी प्रकल्पालाही ईसीची प्रतीक्षा आहे. विकासात्मक प्रकल्पांसाठी ईसी अनिवार्य आहे.

- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.